25 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeराजकीयमनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाची ठिणगी देशपातळीवर

मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाची ठिणगी देशपातळीवर

राज्यात अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे-पाटील (Manoj jarange-Patil) यांनी सरकारकडे मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. आतापर्यंत मनोज जरांगेंनी राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी सभा घेतल्या आहेत. यासभेवर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणामध्ये ओबीसी येत असल्याच्या अनेक टीका टीप्पण्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला सामावून घ्यावं अशी मागणी सरकारकडे केली होती. मात्र सरकार यावर ठोस पाऊल उचलायचं नाव घेत नाही. यामुळे आता मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानावर (mumbai Azad maidan) उपोषण करणार असल्याचं त्यांनी बीडच्या सभेमध्ये सांगितलं आहे. अशातच आता मराठा आरक्षणासाठी केवळ महाराष्ट्रातील मराठा बांधव नसून इतर राज्यातील मराठा बांधव त्याच्यामागे उभा असल्याची माहिती आता समोर येत आहे. (maratha reservetion)

मराठा मोर्चा आरक्षण देशपातळीवर जाणार?

राज्यातील मराठा समाजापुरते असणारे मराठा आरक्षण आता राज्यापुरते मर्यादित न राहता देशपातळीवर जाण्याची चिन्हे आहेत. कारण आता मराठा आंदोलक मनोज जरांगे २० जानेवारी दिवशी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी जाणार असून देशातील एका राज्याने मराठा समाजाला आरक्षणाबाबत पाठिंबा दिला आहे. हरियाणा राज्याचा जरांगेंना पाठिंबा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. खरं तर ही बाब आश्चर्यचकीत होणारी आहे. राज्यात आरक्षण न मिळाल्याने देशपातळीवर मराठा आरक्षण जाईल.

हे ही वाचा

‘माझी लेकरं सरकारच्या स्वाधीन करत आहे’; धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरूणाची सुसाईड नोट आली समोर

अमोल कोल्हेंना लख लाभ, मी काल सांगितलेलं माझं फायनल; अजित पवारांचा हल्ला बोल

हार्दिक पांड्याला १५ कोटींऐवजी मिळाले तब्बल ‘एवढे’ कोटी?

मराठा आरक्षणासाठी रोड मराठा समाजाचा पाठिंबा

हरियाणाच्या पानीपतच्या रोड मराठा समाजाने मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. सरकार समाजाला आरक्षण देईल अशी आम्हाला आशा आहे. मात्र सरकारने महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर आम्ही जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला देशव्यापी आंदोलन बनवू असा इशारा हरियाणातील रोड मराठा समाजाने दिला आहे.

रोड मराठा समाजाची भूमिका

मराठा समाज हा देशातील प्रत्येक राज्यामध्ये आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही राज्यस्तरीय असलेले मराठा आंदोलन हे देशपातळीवर घेऊन जाण्यात येईल. आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. अशी भूमिका रोड मराठा समाजाने घेतली आहे. १४ जानेवारीला हरियाणा येथे होणाऱ्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी पुण्यात आले असताना भूमिका मांडली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी