32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमनोरंजनकतरीना, प्रियंका आणि रश्मिका मंदानानंतर आता नोरा फतेही झाली डीपफेकची शिकार

कतरीना, प्रियंका आणि रश्मिका मंदानानंतर आता नोरा फतेही झाली डीपफेकची शिकार

काही दिवसांपासून अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. अभिनेत्री कतरीना कैफ, प्रियंका चोपडा, रश्मिका मंदाना या अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध डान्सर नोरा फतेहीचा डीपफेक व्हिडीओ (Nora Fateh Deepfake video) व्हायरल झाला आहे. याबाबतची माहिती नोराने सांगितली आहे. तिनं आपल्या इंस्टाग्राम हॅंडेलवर स्टोरी शेअर केली असून तिच्या डिपफेकबाबत सांगितलं आहे. ‘तिनं स्क्रीनशॉट शेअर करत ‘धक्कादायक ही मी नाहीये’, असं लिहिलं असून तिनं शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये एका ब्रॅंडची जाहिरात करताना दिसत आहे. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

नोराचा डीपफेक व्हिडीओ एका तरूणानं तयार केला आहे. यामध्ये नोरा एका ब्रॅंडबद्दल माहिती सांगत आहे. या ब्रॅंडच्या खरेदीबाबतचा अवधी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी नोराच या व्हिडीओमध्ये हुबेहुब दिसते. तिची तब्येत, आवाज सर्व काही जसंच्या तसं एडीट करण्यात आलं आहे. ज्या कंपनीसाठी हा डीपफेक व्हिडीओ बनवला होता, त्या कंपनीने सारे आरोप फेटाळून लोकांमध्ये जागृकता निर्माण करण्याचा हेतू असल्याचं सांगितलं आहे.

हे ही वाचा

सोमवारी उद्धव ठाकरेंची तोफ नाशिकमध्ये धडाडणार, मनसेकडून ५१ हजार मोतीचूरचे लाडू वाटप

१० लाख दिव्यांनी लखलखणार आयोध्या

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी देशद्रोही’

सोनू सुदच्या नावाने डिपफेक व्हिडीओ बनवून पैशाची मागणी

केवळ बॉलिवूड अभिनेत्री नाहीतर आता बॉलिवूड अभिनेता सोनू सुदचा डिपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावेळी सोनू सुद पैशाची मागणी करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र तो सोनू सुद नव्हता. सोनू सुदच्या डिपफेक व्हिडीओचा वापर करून सर्व केलं गेलं आहे. त्यानंतर हा खुलासा स्वत: सोनू सुदने सोशल मीडियावर डीपफेक व्हिडीओ शेअर करून केला आहे.

सचिन तेंडुलकरला डीपफेकपासून सुट्टी नाही

क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील डीपफेकचा शिकार झाला आहे. डीपफेक व्हिडीओचा वापर एका अॅपच्या जाहिरातीसाठी करण्यात आला, अशी माहिती एबीपी माझानं दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी