27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीय१० लाख दिव्यांनी लखलखणार आयोध्या

१० लाख दिव्यांनी लखलखणार आयोध्या

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आता काहीच तास उरले आहेत. एका-एका सेकंदाने देशवासीयांच्या आनंदात भरभराटी येणार आहे. असंख्य वर्षांपासून विखूरलेलं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. देशातील असंख्य नागरिकांनी मंदिरासाठी प्राणांची आहुती दिली आहे. अशातच आता आयोध्या १० लाख दिव्यांनी लखलखणार आहे. यासाठी केवळ देशातून नाहीतर जगभरातील मान्यवर या सोहळ्यासाठी येणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आयोध्या येथील नदीच्या काठावरील मातीपासून  बनवलेल्या दिव्यांचा वापर करत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेदिवशी सायंकाळी १० लाख दिव्यांनी आयोध्या लखलखणार आहे. दिपोत्सवाच्या रोषणाईसोबत फुलांची सजावट देखील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेदिवशी होणार आहे. यामुळे आता देशवासीयांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा दिवस असणारा आहे.

१० लाख दिव्यांनी आयोध्येमध्ये लखलखलाट

गुजरातमधील शरयु नदी काठाच्या मातीपासून बनवलेले दिवे रामलल्लाच्या आयोध्येतील मंदिराला प्रकाशमय करणार आहे. तब्बल १० लाख दिव्यांचा वापर करून आयोध्येतील मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर म्हणजेच पौराणिक स्थळ, आयोध्येतील दुकानं, आस्थापना आणि घरांना दिवे लावण्यात येणार आहेत.

 

हे ही वाचा

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी देशद्रोही’

‘आता मरोस्तोवर हटत नाही…’

विश्वगुरू होण्यासाठी गांधी-नेहरूंची बदनामी – पूर्वार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला १० हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर

रामलल्लाच्या प्राणप्रितिष्ठेसाठी ७ हजार १५० लोकं आपली उपस्थिती दाखवणार आहेत. यामधील ११२ हे परदेशी असल्याची माहिती आता समोर आली आहे. तसेच आयोध्येवर छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. यावेळी १४० चार्टर्ड विमान उतरवण्यात येणार आहे. तसेच मंदिराभोवती सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. विनाआमंत्रण आयोध्येमध्ये कोणालाही परवानगी नाही. ड्रोनच्या माध्यमातून आयोध्येवर नजर ठेवण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे निर्देशक काय म्हणाले?

कार्यक्रमाचे निर्देशक प्रशांत कुमार यांनी सुरक्षेबाबत माहिती दिली आहे. ‘संपूर्ण जिल्ह्यामध्ये तब्बल १० हजार सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. यासोबतच पोलिस सैनिकही तैनात करण्यात आले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येणार’, असल्याची माहिती कार्यक्रमाचे निर्देशक प्रशांत कुमार यांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी