28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयसोमवारी उद्धव ठाकरेंची तोफ नाशिकमध्ये धडाडणार

सोमवारी उद्धव ठाकरेंची तोफ नाशिकमध्ये धडाडणार

सध्या देशभरामध्ये सोमवारी आयोध्येमध्ये असणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देश एकवटला आहे. याच दिवशी शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे. त्यांच्या हस्ते मंदिरामध्ये महाआरती होणार आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं. त्यानंतर नाशिकमध्ये रोडशो देखील केला होता. अशातच आता २२ जानेवारी दिवशी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळाराम मंदिराला येण्याचं आमंत्रण दिलं आहे. अशातच आता नाशिक येथील मनसेनं देखील कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाआरती आधी मनसे काळाराम मंदिरामध्ये आरती करणार आहे.

मनसे ५१ हजार मोतीचूरचे लाडू वाटणार

नाशिकच्या काळाराम मंदिराचा एक मोठा इतिहास आहे. सोमवारी उद्धव ठाकरेंच्या येण्यानं नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांची काय भूमिका असणार आहे. याबाबतची माहिती त्याच दिवशी समजेल. अशातच आता मनसेनं देखील काळाराम मंदिराची आरती करणार असल्याची माहिती सांगितली आहे. यासाठी तब्बल ५१ हजार मोतीचूरचे लाडू वाटणार असल्याची माहिती मनसेनं दिली आहे.

हे ही वाचा

१० लाख दिव्यांनी लखलखणार आयोध्या

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी देशद्रोही’

शरद पवारांनी सांगितले, गांधी – नेहरू यांचे महात्म्य

मनसे कार्यालयामध्ये लाडू बनवण्यासाठी सुरूवात

सकाळी ९ वाजता काळाराम मंदिरामध्ये मनसे आरती करणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आरती करतील. यासाठी तब्बल ५१ हजार मोतीचूरचे लाडू शहरभरामध्ये प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे. काही दिवसांपासून मनसेच्या कार्यालयामध्ये लाडू बनवण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार?

२२ जानेवारीला काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर २३ जानेवारी दिवशी शिवसेना दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यावेळी नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचं महाअधिवेशन असणार आहे. यामुळे नाशिकमध्ये ते विविध मुद्द्यांवर ते बोलणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता उद्धव ठाकरे यांची हुतात्मा अनंत कान्हेरे यांची जाहीर सभा होणार आहे. यासभेमध्ये उद्धव ठाकरे नेमके कोणाला टार्गेट करणार आहेत, हे पाहणं उत्कंठावर्धक असणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी