31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीय'पंतप्रधान नरेंद्र मोदी देशद्रोही'

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी देशद्रोही’

राज्यामध्ये अनेक दिवसांपासून आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. यामुळे नेत्यांमध्ये आरोपप्रत्यारोप दिसत आहेत. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधी नेते सत्ताधारी पक्षावर टीका टिप्पणी करताना दिसत आहेत. राज्याचं राजकारण हे सध्या अगदीच खालच्या पातळीवर असल्याचं अनेकजण दावा करत आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सत्ताधारी आणि केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ते पुण्यातील तळेगाव येथील एका सभेमध्ये बोलत होते. यावेळी बोलत असताना त्यांनी वेदांता प्रकल्पाबाबत (Vedanta project) केंद्र सरकारवर टीका केला आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला घेऊन गेले. मात्र गुजरातला कंपनी उभारण्यासाठी ७ वर्षांचा कालावधी लागणार होता. यामुळे आता ती कंपनी गुजरातमध्ये राहणार नाही. गुजरातचा विकास करण्याच्या नादात देशाचं नुकसान पंतप्रधानांनी (PM modi) केलं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

तळेगाव येथील सभेमध्ये बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते यावेळी बोलत असताना त्यांनी वेदांता प्रकल्पाचा देखील उल्लेख केला आहे. ‘वेदांता प्रकल्प गुजरातला घेऊन गेले. गुजरातमध्ये कंपनी उभारण्यासाठी ७ वर्षांचा कालावधी लागणार होता, म्हणून करार रद्द करण्यात आला आहे. यामुळे गुजरातमध्ये विकास करण्याच्या नादात पंतप्रधानांनी देशाचं नुकसान केलं आहे. यामुळे अनेक तरूणांच्या नोकऱ्या गेल्याने तरूण आता बेरोजगार झाले आहेत. यामुळे आता खरा देशद्रोही कोण?’, असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरलं आहे.

हे ही वाचा

‘आता मरोस्तोवर हटत नाही…’

शरद पवारांनी सांगितले, गांधी – नेहरू यांचे महात्म्य

विश्वगुरू होण्यासाठी गांधी-नेहरूंची बदनामी – पूर्वार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

‘हृदयात राम आणि हाताला काम’

‘२२ जानेवारी दिवशी आयोध्येमध्ये रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. मात्र आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. ‘हृदयात राम आणि हाताला काम’, हे आपलं हिंदुत्व आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं तसेच उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं, मात्र कधी दंगली झाल्या नाहीत’.

‘महाराष्ट्रावर अन्याय होतोय’

राज्यावर सध्या सर्वाधिक अन्याय होत आहे. राज्यामध्ये सध्या आरक्षणासाठी आंदोलन होत आहे. तसेच पहिल्या बैठकीमध्य्ये आरक्षण देऊ असं आश्वासन देऊ असं सांगितलं, मात्र आता राज्यात काय सुरू आहे. महाराष्ट्राने आणखी किती दिवस अन्याय सहन करायचा? महाराष्ट्रावर अन्याय होत आहे. राज्यामध्ये सध्या मिंधे सरकारला आणलं गेलं आहे. हे एक दिवस मंत्रालय गुजरातला घेऊन जातील. अशी टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सध्याच्या सरकारविरोधात केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी