27 C
Mumbai
Saturday, March 2, 2024
Homeमहाराष्ट्रशरद मोहोळवर झालेल्या गोळीबारात आरोपी पोलिसांच्या ताब्यात, गोळीबार करणारा शरद मोहोळचा साथीदारच

शरद मोहोळवर झालेल्या गोळीबारात आरोपी पोलिसांच्या ताब्यात, गोळीबार करणारा शरद मोहोळचा साथीदारच

पुण्यातील कोथरूड येथील सुतारदरा येथे काल (५ जानेवारी) दिवशी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची ( Sharad Mohol) गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. यामुळे आता पुणे शहर या घटनेनं हादरलं आहे. शरद मोहोळला स्थानिक रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यासर्वांमागे गोळीबार करणारा आरोपी हा शरद मोहोळचा साथीदार असल्याची प्रथमिक माहिती समोर आली. यामुळे आता पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. याच दिवशी शरदच्या लग्नाचा वाढदिवस (Sharad Mohol Wedding Anniversary)  होता. शरद आणि पत्नी देव दर्शनासाठी जात असताना शरद मोहोळचा साथीदार साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (sahil Polekar) असं आरोपी व्यक्तीचं नाव असून यानेच शरद मोहोळचा खून केला आहे. याचं कारणही आता समोर आलं आहे.

काय घडलं नेमकं?

शरद मोहोळ आणि त्याच्या पत्नीचा लग्नाचा वाढदिवस होता म्हणून दोघंही देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी तीन आरोपींनी शरद मोहोळवर गोळीबार केला. यामध्ये शरद मोहोळचा साथिदार साहिल पोळेकरने शरदवर गोळी झाडली असल्याची माहिती समोर येत आहे. खांद्याला बंदुकीच्या गोळीचा जबर मार लागला. या खूनामागचे कारणही समोर आले आहे. साहिल पोळेकरच्या जमिन आणि पैशांच्या व्यवहाराप्रकरणी साहिल पोळेकरनं हे पाऊल उचलंलं असल्याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा

‘पोलिसवाले इतकं मारा की गाxxxची हड्डी तुटली पायजे, कुत्र्यासारखं मारा’

कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, पुण्यात मुळशी पॅटर्न

‘शरद मोहोळला त्याच्या जवळच्या साथीदारानं मारलं’, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

शरद मोहोळच्या घरी जेवण करून शरदचीच केली हत्या

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल पोळेकर हा शरद मोहोळच्या घरी गेली ७ ते ८ दिवस येत होता. शरद मोहोळचा खून करण्याआधी त्याने शरद मोहोळच्या घरी जेवण केलं. त्यानंतर शरद आणि पत्नी देवदर्शनासाठी जात असताना त्याने शरद पुढं गेल्यानंतर त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या खूनामागे एक दोघं नसून ७ ते ८ जणांचा हात आहे. अवघ्या ८ तासांमध्ये आठ गुन्हेगार पकडण्यासाठी पोलिसांना यश आलं आहे.


८ तासांमध्ये आरोपींना पकडण्यास यश

शरद मोहोळवर तिघांनी हल्ला केला. यामध्ये तिघं नसून ८ जणांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार इतर आरोपी पुण्याजवळील शिरवळकडे जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. केवळ ८ तासांमध्ये आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्यानं पोलिसांना यश मिळालं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी