27 C
Mumbai
Tuesday, January 30, 2024
Homeमनोरंजनरश्मीका मंदाना आणि विजय देवरकोंडाचा 'या' महिन्यामध्ये होणार साखरपूडा?

रश्मीका मंदाना आणि विजय देवरकोंडाचा ‘या’ महिन्यामध्ये होणार साखरपूडा?

सध्या मनोरंज विश्वामध्ये अनेक अभिनेत्री आणि अभिनेते विवाहबंधनामध्ये अडकत आहेत. नुकतंच बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खानने लग्न केलं आहे. तसेच तसेच काही दिवसांआधी अभिनेता अमिर खानची मुलगी आयरा खानने आपला प्रियकर नुपूर शिखरेसोबत कोर्ट मॅरेज केलं आहे. यानंतर आता एक दक्षिणात्य जोडी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. त्या जोडीची चर्चा देखील सर्वत्र आहे. ती जोडी म्हणजे दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika mandanna) आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay deverakonda). ही जोड चाहत्यांच्या पसंतीस आहे. आता हे दोघं लवकरच आपला साखरपुडा करणार असल्याच्या केवळ चर्चा आहेत.

रश्मिका आणि विजय देवरकोंडा हे एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत. यांची जोडी ही केवळ दक्षिणात्य चित्रपटांपूरती मर्यादीत नसून या जोडीची चर्चा आता देशभरामध्ये आहे. अनेक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत असून लवकरच त्यांचा साखरपुडा होणार असल्याच्या केवळ चर्चांना उधाण आलं आहे. ते अनेकदा एकाच चित्रपटामध्ये देखील दिसले आहेत. यामुळे आता ते विवाहबंधनामध्ये कधी अडकणार असा चाहत्यांना सवाल उपस्थित होत आहे. यावर आता एका चाहत्याने याबाबत कमेंट केली आहे. यावर रश्मिकाने प्रतिक्रिया देखील दिली आहे.


हे ही वाचा

मोदी म्हणतात, ‘२२ जानेवारी दिवशी दिवाळी साजरी करा’; प्रकाश आंबेडकर म्हणतात ‘ एक हजार रूपये द्या’

श्रीराम मंदिरासाठी आजीबाईचे ३० वर्षांपासून व्रत सुरू

कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होईनात, आता तर शेतकऱ्यांच्या मुलांच्या डोळ्यात पाणी

एबीपी माझाच्या वृत्तानूसार एका चाहत्याने रश्मिका मंदानाला ‘तु नॅशलन क्रश आहे. तुझ्यासारखी पत्नी आम्हालाही मिळेल अशी आशा आहे.’ अशी कमेंट एका चाहत्याने रश्मिकाच्या फोटोवर केली आहे. यावर आता रश्मिकाने ओह…मी जेव्हा लग्नाचा विचार करेल तेव्हा माझा पतीदेखील अशाच विचार करणारा असावा असा रिप्लाय रश्मिकाने दिला आहे.

दुसऱ्या आठवड्यामध्ये विजय आणि रश्मिकाचा साखरपुडा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. ते प्रत्येक सण एकत्र येऊन साजरा करतात. गीता गोविंदम या सिनेमामध्ये रश्मिका आणि विजय हे दोघांची पहिली भेट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्याच्यातील घट्ट मैत्री वाढू लागली आहे. ते अनेकदा स्पॉट झाले आहेत. यामुळे आता दोघंही विवाहबंधनात अडकणार का? असा सवाल आहे. मात्र अजूनही अधिकृत माहिती समोर आली नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी