34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयमोदी म्हणतात, '२२ जानेवारी दिवशी दिवाळी साजरी करा'; प्रकाश आंबेडकर म्हणतात '...

मोदी म्हणतात, ‘२२ जानेवारी दिवशी दिवाळी साजरी करा’; प्रकाश आंबेडकर म्हणतात ‘ एक हजार रूपये द्या’

२२ जानेवारी दिवशी संपूर्ण देशामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. अनेक वर्षांपासून अपूरं असणारं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. यामुळे आता सर्वजण या दिवसाची वाट पाहत आहेत. राम मंदिराचा उद्घाटन सोहळा २२ जानेवारी दिवशी असल्याने या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन देशातील नागरिकांना केलं आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या आवाहनाचं स्वागत केलं आहे. यासाठी केवळ आयोध्या नगरीच नव्हे तर संपूर्ण उत्तर प्रदेश सज्ज झालं आहे. अशातच मोदींनी केलेल्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर यांनी दिवाळी साजरी करण्यासाठी हजार रूपये देण्याची मागणी केली आहे.

ज्यावेळी पत्रकार परिषद झाली होती यावेळी त्यांनी ही मागणी केली. अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापणेचं मला अजून निमंत्रण आलेलं नाही. मी वर्तमानपत्र वाचत आहे निमंत्रण येणार आहे असं सांगितलं जात आहे. म्हणून मी निमंत्रणाची वाट पाहत आहे. आपण सांगितल्या थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. आम्ही त्यांचा सल्ला ऐकला. आताचं आवाहनही आम्ही मान्य करू देशामध्ये अनेक कुटुंब दारिद्रय रेषेखालील आहेत. त्यांना मोदींनी प्रत्येकी एक हजार रूपये द्यावेत. यामुळे घरामध्ये गोडधोड करता येईल. असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

हे ही वाचा

श्रीराम मंदिरासाठी आजीबाईचे ३० वर्षांपासून व्रत सुरू

कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होईनात, आता तर शेतकऱ्यांच्या मुलांच्या डोळ्यात पाणी

टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ, अफगानिस्तान टी 20 सामन्याविरोधात सुर्या मावळणार? ‘या’ मोठ्या आजाराशी देतोय झुंज

२२ जानेवारी दिवशी दारिद्रय रेषेखालील लोकांना दिवाळी साजरी करायची असेल तर त्या लोकांना स्वत:ची पदरमोड करावी लागेल. ते होऊ नये म्हणून त्यांना महिनाभरामध्ये इतर दिवशी गोडधोड करता येणार नाही. यासाठी सरकारने दारिद्रय रेषेखालील लोकांना दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधानांच्या इच्छेपूर्तीसाठी हजार रूपये दिले पाहजे.

;

राज्यातील तलाठी भरतीवरून काय म्हणाले प्रकाश आंबोडकर?

सध्या राज्यामध्ये तलाठी भरतीवरून अनेक वाद होत आहेत. यावरूनही प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परीक्षा आणि पोर्टर यावरून नावे जाहीर करा. अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. मुख्यमंत्र्यांनी ही विनंती मान्य केली. जर वाद नको असेल तर पोर्टर सिस्टीम आणायला हवी. परीक्षा आल्यानंतर रॅंकनुसार त्यांची नावे डिस्प्ले व्हायला हवी.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी