33 C
Mumbai
Wednesday, February 28, 2024
Homeमहाराष्ट्रकांद्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होईनात, आता तर शेतकऱ्यांच्या मुलांच्या डोळ्यात पाणी

कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होईनात, आता तर शेतकऱ्यांच्या मुलांच्या डोळ्यात पाणी

दिवाळी हा सण झाल्यानंतर तुलशीचं लग्न असतं. तुळशीचं लग्न झाल्यानंतर राज्यभरामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात लग्नाचा जोर वाढतो. लग्न करण्यासाठी अनेकांचा कल असतो. तसेच आपलं लग्न कसं असावं. याबाबत आधीच योजना आखलेल्या असतात. मग ते लग्न शेतकऱ्यांचं असो वा आणखी कोणाचं. ऑक्टोबर, नोव्हेंबर हा दिवस शेतकऱ्यांसाठी सुगीचा असल्याचं बोललं जातं. या हंगामामध्ये कांदा उत्पादनाला चांगलं उत्पादन मिळतं. यामुळे या हंगामामध्ये शेतकरी कांद्याचं उत्पादन करत असतात. यामुळे लग्न देखील धुमधडाक्यात होतं. मात्र कांद्याचं उत्पादन न झाल्यानं शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचं काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

नोव्हेंबर महिन्यमध्ये कांद्याला चांगली मागणी असते. याच महिन्यामध्ये कांद्याला भावदेखील चांगला असतो. याचा उपयोग शेतकऱ्यांना होतो. ३८०० ते ४२०० रुपये प्रती क्विंटल चांगला बाजारभाव मिळतो. मात्र यंदा तसं झालं नाही. यंदा कांद्याच्या किंमतीमध्ये वाढ नसल्यानं गणित उलटं झालं आहे. कांद्याला भाव नसल्यानं शेतकरी अडचणीमध्ये आले आहेत. अर्थिक कारणांमुळे त्यांच्या घरातील लग्न आणि इतर शुभकार्य रखडलं आहे. मिर्यातीव बंदी आणल्याने कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. अशातच आता कांदा उत्पादन शेतकऱ्यांना प्रती क्विंटल मागे दोन हजार रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

हे ही वाचा

टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ, अफगानिस्तान टी 20 सामन्याविरोधात सुर्या मावळणार? ‘या’ मोठ्या आजाराशी देतोय झुंज

‘आमच्यावर बलात्कार होतोय’, ८ महिला पोलिसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

‘बच्चा है पर मन का सच्चा है’, अजित पवारांच्या टीकेला रोहित पवारांचं गाण्यातून मिश्किल प्रत्युत्तर

कांद्याचा भाव हा १८०० ते २००० रूपयांपर्यंत खाली आले आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे हंगामामध्ये दीड ते तीन लाख रूपयांपर्यंत अर्थिक नुकसान होत आहे.  कुटुंबाचे उदरनिर्वाह करायचे की मुला मुलींचे लग्न करायचे अशा दुहेरी संकटामध्ये शेतकरी सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मुला मुलींची लग्न पुढं ढकलली जात आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी