25 C
Mumbai
Wednesday, January 31, 2024
Homeराजकीय'माझा नवरा वाघ होता आणि मी वाघीण', शरद मोहोळच्या मृत्यूनंतर पत्नी स्वाती...

‘माझा नवरा वाघ होता आणि मी वाघीण’, शरद मोहोळच्या मृत्यूनंतर पत्नी स्वाती मोहोळ माध्यमांसमोर

पुण्यात शरद मोहोळ याची (५ जानेवारी) दिवशी कोथरूड येथील सुतारदरा परिसरामध्ये तीन ते चार गोळ्या घालून त्याच्याच साथीदारांनी नियोजनबद्ध काटा काढला आहे. यामुळे पुणे शहर हादरलं आहे. यामुळे पुन्हा एकदा टोळी युद्धाला सुरूवात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका जुन्या जमिनीच्या वादावरून हा खून झाला आहे असं सांगितलं आहे. यामध्ये दोन वकिलांची देखील साथ असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता शरद मोहोळच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी स्वाती मोहोळ या आता प्रथमच माध्यमासमोर आल्या असून त्या आक्रमक झाल्या आहेत. यावेळी भाजप नेते नितेश राणे यांनी शरद मोहोळ यांच्या घरी जावून स्वाती मोहोळ यांंचं सांत्वन केलं आहे.

काय म्हणाल्या स्वाती मोहोळ?

शरद मोहोळच्या मृत्यूनंतर स्वाती मोहोळ प्रथमच माध्यमांच्या समोर आल्या. यावेळी त्यांनी शरद मोहोळ यांच्या खूनाबद्दल सांगत असताना, ‘पती हिंदुत्वासाठी काम करत असल्याने त्यांचा खून करण्यात आला’, असं स्वाती म्हणाल्या आहेत. ‘समोरच्याला वाटत असेल की मी असं केल्यानं खचून जाईल पण त्यांना माझं एकच सांगणं आहे की मी एका हिंदुत्वावादी व्यक्तीची बायको आहे. माझा नवरा वाघ होता, मी वाघीण त्याची वाघीण आहे. मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मराण येत नाही तोपर्यंत लढणार, माझा सरकारवर आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे’, असं त्या म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा

रश्मीका मंदाना आणि विजय देवरकोंडाचा ‘या’ महिन्यामध्ये होणार साखरपूडा?

मोदी म्हणतात, ‘२२ जानेवारी दिवशी दिवाळी साजरी करा’; प्रकाश आंबेडकर म्हणतात ‘ एक हजार रूपये द्या’

कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होईनात, आता तर शेतकऱ्यांच्या मुलांच्या डोळ्यात पाणी

दरम्यान स्वाती मोहोळ यांच्या वक्तव्यानंतर त्याच्या मागे असणाऱ्या नागरिकांनी ‘जय श्री राम’ अशा घोषणा दिल्या आहेत. यावेळी तेथील काही नागरिकांनी ‘भाऊ (शरद मोहोळ) हे रहिवाशांसाठी देवमाणूस होते. ते इथं वास्तव्याला आल्यापासून कोणाची भिती वाटत नव्हती.’

‘शरद मोहोळची मीडियाकडून चुकीची प्रतिमा’

‘त्यांची (शरद मोहोळ) मीडियाकडून चुकीची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी आहे. ते गुन्हेगार क्षेत्रामध्ये का आले? कसे आले? त्याची कोणालाही माहिती नव्हती. चुकीची प्रतिमा तयार करणं हे मीडियाने थांबबावं’, असं आवाहन नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी