29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराष्ट्रीयश्रीराम मंदिरासाठी आजीबाईचे ३० वर्षांपासून व्रत सुरू

श्रीराम मंदिरासाठी आजीबाईचे ३० वर्षांपासून व्रत सुरू

देशामध्ये २२ जानेवारी हा फार महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी करोडो राम भक्तांचे तसेच देशवासियांचे अनेक वर्षांपासून रखडलेलं स्वप्न पूर्ण होणार आहे. राम मंदिराचा मुद्दा सर्वत्र गाजत आहे. राम मंदिराच्या मुद्द्याला अनेक नवनवीन वळण भेटत आहे. काही दिवसांपासून राम मंदिराच्या मुद्द्याला राजकीय रंग प्राप्त होत आहे. राज्यातील अनेक नेत्यांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवलं नसल्याने वेगळ्याच चर्चा आहेत. अशातच आता हा राम मंदिराचा मुद्दा आणखी एका बाबतीत चर्चेत आहे. एक ८५ वर्षीय आजीबाईने राम मंदिर बांधण्यासाठी ३० वर्षांपासून मौनव्रत केलं आहे. त्या आजीबाई ३० वर्षांनंतर पुन्हा राम मंदिराच्या सोहळ्याला जाऊन मौनव्रत सोडणार आहे.

आतापर्यंत आपण पायी चालत जाणाऱ्या मुस्लिम मुलीबाबत ऐकलं होतं. मात्र आता एका चित्रपटाला लाजवेल अशी घटना आता समोर येत आहे. झारखंड येथील आजीबाई यांनी तब्बल ३० वर्षे राम मंदिर होण्यासाठी व्रत केलं होतं. आजीबाई गेली ३० वर्षांपासून कोणत्याही व्यक्तीशी बोलल्या नाहीत. त्यांनी ३० वर्षांआधी राम मंदिर होईपर्यंत मी कोणाशीच बोलणार नाही, अशी शपथ घेतली होती. मात्र आता २२ जानेवारी ही तारीख जवळ येताच आजीबाई सरस्वती अग्रवाल ह्या मौनव्रत सोडणार आहे. प्रभू श्रीरामाच्या चरणी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या सरस्वती अग्रवाल आपला वेळ आयोध्येत घालवतात.

हे ही वाचा

कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होईनात, आता तर शेतकऱ्यांच्या मुलांच्या डोळ्यात पाणी

टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ, अफगानिस्तान टी 20 सामन्याविरोधात सुर्या मावळणार? ‘या’ मोठ्या आजाराशी देतोय झुंज

‘बच्चा है पर मन का सच्चा है’, अजित पवारांच्या टीकेला रोहित पवारांचं गाण्यातून मिश्किल प्रत्युत्तर

‘रामनाम’ म्हणत मौन सोडणार

राम मंदिर होत असल्याने त्यांचं जीवन हे धन्य झालं आहे. राम लल्लाने मला प्राणप्रतिष्ठेसाठी बोलवलं आहे. माझी तपश्चर्या आणि ध्यान याचे फळ मला मिळत आहे. तब्बल ३० वर्षानंतर माझे मौन मी रामनाम म्हणत सोडणार आहे. सरस्वती अग्रवाल यांनी म १९९२ मध्ये आयोध्येला गेल्या होत्या. त्या आता थेट आता २२ जानेवारी दिवशी रामाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जाणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी