बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) हा नेहमीच चर्चेमध्ये असतो. त्याने आतापर्यंत केलेल्या चित्रपटांमध्ये करोडे रूपयांची कमाई केली आहे. सलमान खानला अनेकदा काही माध्यमांवर तसेच काही कार्यक्रमांमध्ये आवडतं ठिकाण कोणतं आहे? अनेकदा सवाल केला होता. त्यावेळी त्याने पनवेलचं फार्महाऊस (Panvel Farmhouse salman) असं सांगितलं आहे. त्याने अनेकदा आपला वाढदिवस हो आपल्या फार्महाऊसवर घालवला आहे. याच फार्महाऊसवर शेती करताना दिसला आहे. एवढंच नाही तर कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये सलमान खानने आपलं लॉकडाऊन हे फार्महाऊसवर घालवलं आहे. यामुळे सलमानला पनवेलचं फार्महाऊस हे फार महत्वाचं आहे. मात्र आता याच फार्महाऊसमध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.यामुळे आता एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे. अर्पिता फार्महाऊस (Arpita Farmhouse) असं त्याच्या फार्महाऊसचं नाव आहे.
पनवेलच्या फार्महाऊसवर सलमान खान आपली सुट्टी घालवण्यासाठी जात असतो. मात्र आता याच फार्महाऊसवर दोन अज्ञात व्यक्तींनी भाईजानच्या फार्महाऊसवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. हे नेमकं फार्महाऊसवर असलेल्या सुरक्षारक्षकाने पाहिलं. कोणाचीही परवानगी न घेता दोन व्यक्ती आतमध्ये जाण्याच्या मार्गावर होते. यावेळी सुरक्षारक्षकांना त्या दोन व्यक्तींना अडवण्यात आल्याचं यश आलं आहे. त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
Two people try to illegally enter Salman Khan’s Panvel farmhouse; Police takes action @kotakyesha shares all the details#SalmanKhan #Panvel #Bollywood pic.twitter.com/ITjdv5PVFK
— News18 (@CNNnews18) January 8, 2024
हे ही वाचा
आठही महिला पोलिसांकडून पत्र खोटं असल्याचा दावा
रश्मीका मंदाना आणि विजय देवरकोंडाचा ‘या’ महिन्यामध्ये होणार साखरपूडा?
श्रीराम मंदिरासाठी आजीबाईचे ३० वर्षांपासून व्रत सुरू
सलमान खानचं फार्महाऊस बरंच मोठं आहे. चारही बाजूंची सुरक्षारक्षक असतात. तसेच चारही बाजूंनी तारेचं कंपाउड आहे. मात्र त्या तरूणांनी तारेचं कंपाउड तोडूनच जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षकांनी पाहिलं आणि अडवलं. यावळी त्यांची विचारपूस करण्यात आली. त्यावेळी आपापली नावं सांगितली मात्र त्यांचा तपास करत असताना आधारकार्ड पाहण्यात आलं. त्या आधारकार्डवर भलतंच नाव होतं. ते व्यक्ती जे नाव सांगत होते. ते नाव त्या आधारकार्डवर नव्हतेच. यावेळी त्या दोघांनाही पनवेल तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
सलमान खानवर गेली अनेक दिवसांपासून धमकीचे फोन येत असल्याची चर्चा आहे. त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. यामुळे आता सलमानच्या चाहत्यांसाठी चिंतेची बाब आहे. पनवेल पोलिस आता त्या माहितीचा शोध घेत असल्याचं समजते.