मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या ८ महिला पोलिसांनी याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं होतं. यावेळी त्यांनी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करत पत्राद्वारे मांडला आणि त्या पत्रात पोलिस अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या गैरवर्तवणूकीची नोंद करण्यात आली. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करणाऱ्यांवरच रक्षणाची वेळ आली. यामध्ये तीन अधिकारी आणि उपायुक्तांचा देखील समावेश आहे. यामुळे या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. मात्र आशातच याच घटनेच्या पार्श्वभूमीवर माहिती समोर आली आहे. आठही महिला मुंबई पोलिसांनी हे पत्र खोटं असल्याचं सांगितलं आहे. राज्यामध्ये या घडलेल्या घटनेमुळे सामान्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होत आहे.
आठही महिला पोलिस शिपायांनी त्यांच्यासोबत कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे तसेच अशी कोणतीही तक्रार न झाल्याचं त्यांनी स्पष्टोक्ती दिल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या नावाचा गैरवापर झाला असल्याचा आरोप महिला शिपायांनी केला आहे. मोटार विभागातील पोलिस उपायुक्त तसेच दोन पोलिस निरिक्षकांनी त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांना बलात्कार तसेच गर्भपात केल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तसेच मुंबई पोलिस आयुक्तांना हे पत्र पाठवण्यात आलं होतं. मुंबई पोलिसांनी चौकशीला सुरूवात करून बनावट पत्र कोणी पाठवलं आणि त्या मागच्या उद्देशाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा
‘माझा नवरा वाघ होता आणि मी वाघीण’, शरद मोहोळच्या मृत्यूनंतर पत्नी स्वाती मोहोळ माध्यमांसमोर
रश्मीका मंदाना आणि विजय देवरकोंडाचा ‘या’ महिन्यामध्ये होणार साखरपूडा?
मोदी म्हणतात, ‘२२ जानेवारी दिवशी दिवाळी साजरी करा’; प्रकाश आंबेडकर म्हणतात ‘ एक हजार रूपये द्या’
काय होतं पत्रात?
मुंबईतील मोटार परिवहन विभागातील काम करणाऱ्या आठ मुंबई पोलिस दलातील महिलांवर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. हा बलात्कार मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांकडून आत्याचार झाल्याचा आरोप त्या पत्रामध्ये करण्यात आला. मागील अनेक दिवसांपासून बलात्कार करण्याचा दावा या पत्रामध्ये करण्यात आला आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यांना गर्भपात करण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता, असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
Fake letter alleging senior cops raped women constables goes viral; police initiates inquiry https://t.co/Hk1M2ccRax #Mumbai #Maharashtra
— Express Mumbai (@ie_mumbai) January 7, 2024
पत्रातील आरोप खोटे
पत्रात केलेले आरोप हे खोटे असल्याचा दावा महिला पोलिसांनी केला आहे. पत्र हे बनावट असून आठ महिलांच्या नावाचा वापर करून पत्र तयार केलं असल्याचा दावा महिला पोलिसांनी केला आहे. अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं मुंबई महिला पोलिस म्हणाले आहेत.