25 C
Mumbai
Tuesday, January 30, 2024
Homeराजकीयठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड

ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड

राज्यात आगामी लोकसभा निवडणूक पाहता ईडीचे (ED) धाडसत्र सुरू झाले आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे. संपूर्ण तपासणी सुरू असल्याची माहिती आता समोर आली आहे. काही दिवसांपासून शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर धाड टाकली आहे. यावर आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘होऊद्या दुध का दुध आणि पाणी का पाणी’, ‘ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे’, अशा शब्दात समाचार घेतला आहे.

माध्यमांनी वायकर यांच्या ईडीवरून विचारलेल्या प्रश्नास काय म्हणाले एकनाथ शिंदे?

रवींद्र वायकर यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली आहे. यावरून माध्यमांनी प्रश्न विचारला असता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर उत्तरले. ‘ईडी ही राज्याची अखत्यारीत नाही. तर ती केंद्राची अखत्यारीत आहे. असं म्हणत विरोधकांवर हल्ला केला आहे’. ते बोलत असताना, ‘ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे, होऊद्या दुध का दुध पाणी का पाणी’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ‘हे सरकार सूडबुद्धीने वागत नाही आकासापोटी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही’, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

हे ही वाचा

सलमानच्या फार्महाऊसवर दोन व्यक्तींची घुसखोरी, ओळखपत्रात होतं भलतंच नाव

आठही महिला पोलिसांकडून पत्र खोटं असल्याचा दावा

मोदी म्हणतात, ‘२२ जानेवारी दिवशी दिवाळी साजरी करा’; प्रकाश आंबेडकर म्हणतात ‘ एक हजार रूपये द्या’

शिवसेना आमदार अपात्र याचिकेवर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत सुनावणी करणार आहेत. याकडे राज्याचे आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून रवींद्र वायकर यांच्यावर तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचं बोललं जात आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिक संख्याबळ कोणाकडे आहे? असा सवाल करत विरोधकांना टीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

वायकर यांच्यावर ईडीची छापेमारी?

जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने छापेमारी केली. यामध्ये रवींद्र वायकर याचं नाव आलं आहे. अशातच आता सकाळपासून त्याच्या घरी ईडीने तपास सुरू केला आहे. वायकर यांच्या मातोश्री क्लबहाऊसवर चार ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींचं 5 स्टार हॉटेल बांधण्यात आल्याने सकाळपासून त्यांच्या घरी ईडीने छापेमारी सुरू केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी