28 C
Mumbai
Saturday, March 2, 2024
Homeराजकीय'आजचा निकाल सर्व जनतेला मान्य असेल'

‘आजचा निकाल सर्व जनतेला मान्य असेल’

संजय राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार आहेत. ते अनेकदा आपल्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात. त्यांची रोकठोक भूमिका हा सर्वांना माहित आहे. अनेकदा संजय राऊत यांनी माध्यमांसमोर विरोधकांवर टीका टीप्पण्या केल्या आहेत. त्यांच्या बोलण्याच्या शैलीत ते टीकेचे बाण सोडतात. अशातच (१० जानेवारी) दिवशी शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार आपात्रतेबाबत (MLA disqualification) निकाल दुपारी वाचून दाखवतील. याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच निकालाआधी संजय राऊत यांनी हा निकाल फिक्सिंग असल्याचा दावा केला आहे. यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (rahul narvekar) यांनी संजय राऊत यांना इग्नोर करा असं वक्तव्य केलं आहे. त्यानंतर त्यांनी आजचा निकाल हा सर्वच जनतेला मान्य असेल असं माध्यमांशी बोलत असताना सांगितलं आहे. (sanjay raut)

‘संजय राऊत यांना इग्नोर करणं बेस्ट’

संजय राऊत यांनी राहुल नारर्वेकर यांना आजची मॅच फिक्सिंग असल्याचं वक्तव्य केलं आहे. यावर राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांना इग्नोर करा अशी टीका केली. राहुल नार्वेकर म्हणाले की, संजय राऊत काहीही बोलत असतात. उद्या ते म्हणतील की निकाल अमोरीकेतून आणला आहे. त्यांच्या बोलण्याला काहीही एक अर्थ असतो का? संजय राऊत यांच्यासारख्या लोकांना इग्नोर करणंच बेस्ट आहे, असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

हे ही वाचा

‘मोदींच्या वयावरून राजकारणातून बाहेर जावा असं बोलण्याची अजितदादांमध्ये हिंमत आहे?’

मोहम्मद शमी अर्जुन पुरस्काराने सन्मानित, पुरस्कारानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

मनोज जरांगेंच्या कुटुंबाची कुणबी नोंद सापडली

आजच्या निकालात काय होणार? 

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा आज दुपारी निकाल आहे. या निकालाबाबत सर्व माहिती राहल नार्वेकर देणार आहेत. सर्व प्रकरणाबाबत निकालामध्ये माहिती ते सांगणार आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलत असताना महत्त्वाच्या मुद्द्यावर वक्तव्य केलं आहे. ‘आज आमदार आपात्रतेबाबत निकाल दिला जाणार आहे. आजचा निकाल कायद्याला धरूनच दिला जाणार आहे. संविधानात ज्या तरतूदी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आदेशात जे प्रिन्सिपल सेट केलं असेल त्यावर अधारित हा निर्णय घेतला जाणार असून या निकालातून सर्वांना न्याय मिळेल’.

‘या निकालामध्ये कोणत्याही त्रूटी राहणार नाहीत. अत्यंत मूलभूत आणि बेंचमार्क निर्णय असेल. इतकं मी जनतेला अश्वासन देतो. हा निकाल जनतेला मान्य असेल’, असं राहुल नार्वेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी