25 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगेंच्या कुटुंबात कुणबी प्रमाणपत्र नाही

मनोज जरांगेंच्या कुटुंबात कुणबी प्रमाणपत्र नाही

राज्यामध्ये काही महिन्यांपासून मराठा आंदोलक सरकारकडे मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत. आतापर्यंत दोन वेळा मराठा आंदोलकांनी सरकारला वेळ दिला होता. मात्र अजूनही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत कोणतंही पाऊल न उचलता केवळ आश्वासन दिलं आहे. त्या आश्वासनावर अजूनही कोणीही सार्थ ठरलेलं पाहायला मिळत नाही. अशातच आता मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण हवं आहे. मात्र मराठा आरक्षण मिळवण्यासाठी ओबीसी बांधव आणि ओबीसी नेते छगन भुजबळ आक्रमक पावित्रा घेत आहेत. अशातच आता राज्यभर कुणबी प्रमाणपत्रांची माहिती मराठा समाज काढत आहेत. मात्र आता मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या कुटुंबाकडे कुणबी प्रमाणपत्र नसल्याने आता पुढं काय होणार? याकडे सर्व मराठा बांधवांचे लक्ष लागलं आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. उपोषण करत आहेत. त्यांनी राज्यभर दौरे केले आहेत. त्यांच्या आंंदोलनाखाली राज्यामधील मराठा समाजातील अनेक कुटुंबांमध्ये कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी सापडल्या आहेत. अंबड तालुक्यातील १२ गावांमध्ये १२७ नोंदी सापडल्या आहेत. मात्र मनोज जरांगे-पाटील यांच्या कुटुंबामध्येच कुणबी प्रमाणपत्र न सापडल्याने मनोज जरांगे पेचात पडले की काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे. मात्र अशातच मनोज जरांगे यांनी यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा

शाहरूख खानने २०२३ मध्ये केला ‘हा’ विक्रम

सांगलीमध्ये विद्यार्थीनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे, मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकालाच शिकवला धडा

राम मंदिराचा मूर्तीकार उच्चशिक्षित असूनही जपतोय कलेचा वारसा

काय म्हणाले मनोज जरांगे-पाटील?

मनोज जरांगे यांच्या कुटुंबामध्ये एकही कुणबी प्रमाणपत्र सापडलं नाही. त्यांच्या अंतरवाली सराटीमध्येही एकही कुणबी प्रमाणपत्र सापडलं नाही. यावर आता मनोज जरांगेंनी वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, ‘कुणबी प्रमाणपत्र जाणूनबूजुन मिळालं नाही. राज्यात आमचाच समाज आहे. त्यांचे कल्याण होईल. मी स्वार्थी नाही मी मुंबईतून आरक्षण घेऊन येणार आहे. सरकारने हे आंदोलन गांभिर्याने घ्यावं’, असं मनोज जरांगे-पाटील म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर करणार उपोषण

मनोज जरांगे हे मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीहून पायी येणार आहेत. त्यांच्यासोबत मराठा आंदोलकही असतील. ते मुंबईतील आझाद मैदानावर दाखल होऊन मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी