राज्यामध्ये महिला, लहान मुली सुरक्षित नाहीत हे सर्वांना माहित आहे. मात्र तरीही यावर कोणतेही ठोस पाऊल सरकार उचलत नाही. काही शाळांमध्ये मुली कदाचित सुरक्षित असतीलही मात्र ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थींनींच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याआधी राज्यातील अनेक बलात्काराच्या घटना या शाळेतून येण्या-जाण्याच्या वळेत घडलेल्या आहेत. अशातच आता सांगली येथे शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने आपल्याच विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे केले आहेत. यामुळे आता सांगली येथील मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाला चोप देऊन चांगलाच धडा शिकवला आहे.
शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे पवित्र असतं. शिक्षक म्हणजे गुरू असतो. मात्र सांगलीतल्या घटनेने शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा लागली आहे. ज्या विद्यार्थीनीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला ती मुलगी केवळ इयत्ता सहावीला असून तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगायला ती घाबरत होती. याआधी इतर काही मुलींसोबत अशाच काही घटना घडल्या असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी मुलीच्या पालकांनी सांगली मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्याकडे संपर्क साधला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाला चांगलाच चोप दिला आहे.
हे ही वाचा
राम मंदिराचा मूर्तीकार उच्चशिक्षित असूनही जपतोय कलेचा वारसा
राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांची भेट, चर्चांना उधाण
सीमा हैदरने दिली गोड बातमी, ‘कुणी तरी येणार येणार गं…’
आम्ही मुलींना शाळेत कसं पाठवायचं?
विद्यार्थीनींच्या पालकांनी मुलींना शाळेत कसं पाठवायचं? असा सवाल केला आहे. जोपर्यंत हा विकृत शिक्षक शाळेतून निलंबित होत नाही. तोवर आम्ही आमच्या पाल्याला शाळेत पाठवणार नसल्याचं पालक म्हणाले आहेत. या घडलेल्या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालक यांच्या नात्यामध्ये भयावह वातावरण दिसत आहे. यावेळी विकृत शिक्षकाला शाळेतून निलंबन करा असं मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी संस्था संचालकाकडे मागणी केली आहे. घडलेली घटना लक्षात घेता विकृत शिक्षकालाही निलंबित करण्यात आलं आहे.