जन्माष्टमीनिमित्ताने अभिनेता शाहरुख खान आणि नयनतारा यांचा ‘जवान’ चित्रपटानं बॉक्स ऑफिस अक्षरशः दणाणून सोडलंय. ‘जवान’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६५ कोटी ५० लाखांची कमाई करत ‘पठाण’ चित्रपटाला मागे टाकले. ‘पठाण’ चित्रपटानं पहिल्या दिवशी ५५ कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘पठाण’च्या तुलनेत ‘जवान’ची कमाई १९.९ टक्क्यांनी जास्त झालीये.
सरकारमधील भ्रष्टाचाराविरोधात ‘जवान’ चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. शाहरुखनं यात दुहेरी भूमिका साकारली आहे. विक्रम आणि आझाद राठोड या वडील आणि मुलाच्या भूमिकेत शाहरुख वावरला आहे. विक्रम राठोड समाजातील घातक प्रवृत्ती विरोधात बदला घेण्यासाठी पाच मुलींची टीम उभारतो. आझाद राठोडच्या पत्नीच्या भूमिकेत असलेल्या नयनतारा विक्रम राठोडला पकडण्यासाठी विशेष टीम तयार करते. नर्मदा राय राठोड असं नयनताराच्या पात्राचं नाव आहे. नयनतारानं पोलिसांच्या स्पेशल फोर्सच्या प्रमुखाची भूमिका साकारली आहे. नयनतारा विक्रम राठोड ला पकडते का, त्या सहा मुलींचं काय होतं या संकल्पनेवर ‘जवान’ चित्रपटाची कथा रचली गेलीये.
‘जवान’ चित्रपटात सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स वापरल्यानं चित्रपटाचे तांत्रिक बाजू खूप चांगली हाताळल्याची प्रशंसा चित्रपट समीक्षकांनी केलीये. प्रसिद्ध दिग्दर्शक अटली यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळलीये. तामिळ आणि तेलुगु चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती यांनी चित्रपटात नकारात्मक भूमिका केलीये. चित्रपटात दीपिका पादुकोण आणि संजय दत्त यांनी गेस्ट अपिअरन्स केलाय. ‘जवान’मध्ये मराठमोळी गिरीजा ओकने महत्वाची भूमिका साकारलीये.
‘जवान’ चित्रपटाच्या प्रदर्शनाअगोदरच ॲडव्हान्स बुकिंग मध्ये साडेसातला तिकिटांची विक्रमी नोंद झाली. पहिल्याच दिवशी ‘जवान’ सिनेमा ऑनलाईन माध्यमांवर लिंक झाल्यानं पहिल्या दिवसाच्या कमाईविषयी संख्या व्यक्त करण्यात आली होती. मात्र शाहरुखच्या वाढत्या क्रेझनं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली.
हे सुद्धा वाचा
लहानग्या कन्हैय्यांसोबत अभिनेता विकी कौशलनं फोडली दहीहंडी !
राजकारणात अस्पृश्यता पाळली जाते – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा दोन्ही काँग्रेसवर हल्ला
एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची पोलीस कोठडीतच आत्महत्या
यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच शाहरुखचा ‘पठाण’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ‘पठाण’नं ४५० कोटी रुपयांची कमाई केली. ‘जवान’ला ‘गदर२’ सिनेमाच्या कमाईचा मोठं आव्हान आहे. चार आठवड्यात ‘गदर२’नं ५१० कोटी रुपयांची कमाई केली. ३०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये ‘जवान’ चित्रपट बनवला गेलाय. ‘जवान’ सिनेमा ‘गदर२’चा विक्रम मोडून काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.