22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
Homeमनोरंजनश्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; अँजिओप्लास्टीनं तब्येतीत सुधार

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; अँजिओप्लास्टीनं तब्येतीत सुधार

मराठी चित्रपटसृष्टीत काही दिवसांआधी रवींद्र बेर्डे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. अशातच आता मराठी सुपरस्टार श्रेयस तळपदे याला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला आहे. या वृत्ताने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. काही वर्षांपासून श्रेयस मनोरंजन क्षेत्रापासून दूर होता. त्याने पुन्हा एकदा माझी तुझी रेशीमगाठी या मराठी मालिकेतून कमबॅक केलं आहे. त्याचं सद्या एका सिनेमाचं चित्रीकरण सुरू आहे. चित्रीकरण करून तो घरी गेला असता त्याला हृदयविकाराचा झटका आला.

श्रेयस तळपदेचे सध्या वय वर्षे ४७ आहे. मुंबईतील अंधेरी भागातील बेलेव्ह्यू रुग्णालयात श्रेयशला दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णालयात श्रेयस तळपदेची अँजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आल्याचं वृत्त एका इंग्रजी वेबसाईटच्या माध्यमातून समोर आलं आहे. ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. यावेळी त्याने काही अॅक्शन सीन शूट केले होते. त्यानंतर तो घरी आला. त्यावेळी श्रेयसच्या तब्येतीत अचानक बिघाड जाणवू लागला. त्याच्या पत्नीने त्याला अंधेरीतील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करत अँजिओप्लास्टी सर्जरी केली. यामुळे आता अभिनेत्याच्या तब्येतीत सुधार आहे. काही चाहत्यांनी श्रेयसच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत श्रेयसने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

हे ही वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर विष पिऊन मराठा बांधवाची आत्महत्या

‘भुजबळांनी राजीनामा द्यावा’

राज्यात पोलिस भरती होणार; फडणवीसांची घोषणा

वेलकम टू जंगल सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हृदयविकाराचा झटका 

आगामी वेलकम टू जंगल या सिनेमाचे सध्या शूटिंग सुरू आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये श्रेयस तळपदेसोबत रवीना टंडन, सुनील शेट्टी, लारा दत्ता, परेश रावल, तुषार कपूर, राजपाल यादव, कृष्णा अभिषेक, राहुल देव, जॅकलिन फर्नांडिस,जॉनी लीवर, किकू शारदा ही स्टारकास्ट या सिनेमामध्ये दिसणार आहेत.

श्रेयसने आतापर्यंत मराठीतील छोट्या-मोठ्या पडद्यावर, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये 45 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. सध्या तो वेलकम टू जंगल या चित्रपटामध्ये काम करतोय. यावेळी त्याला हृदयविकाराच्या झटक्याला सामोरं जावं लागलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी