34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर विष पिऊन मराठा बांधवाची आत्महत्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर विष पिऊन मराठा बांधवाची आत्महत्या

राज्यात अनेक महिन्यांपासून मराठा समाज सरकारकडे आरक्षणाची (Maratha reservation) मागणी करत आहे. मात्र सरकार याकडे कानाडोळा करत लक्ष देत नाही. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत. एका बाजूला सरकार मराठा समाजाला आत्महत्या करू नका असं सांगत असतानाही मराठा बांधव आत्महत्या (Maratha Protestor Suiceide) करत आहेत. यामुळे त्यांचे कुटुंब निराधार होत आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशनात चर्चा आहे. दरम्यान,  छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यात खामगाव येथे शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर (chatrapati Shivaji maharaj Statue Chatrapati sambhajinagar) मराठा बांधवाने विष पिऊन आत्महत्या केली.

माझ्या मुलांना शिकवण्यासाठी मी कटिबद्ध असताना, माझ्या मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यासाठी मी काहीही करू शकत नाही. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मी आत्महत्या करत आहे. अशा आशयाची चिट्ठी लिहून ३९ वर्षीय मराठा बांधवाने शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर विष पिऊन आत्महत्या केली आहे.

सविस्तर

आत्महत्या केलेल्या मराठा बांधवाचं नाव हे विजय पुंडलिक रोकडे रा.खामगाव ता. फुलंब्री आहे. राज्यभरात मराठा आरक्षणावरून रान पेटलं आहे. यावरून मोर्चे काढले जात आहेत. मनोज जरांगे-पाटील यांनी दोन वेळा आंदोलन आणि उपोषण केलं होतं. मात्र सरकार अजूनही ठोस पाऊल उचलत नाही. आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. अशा स्थितीत मराठा आरक्षणामुळे आत्महत्या सत्र सुरूच आहे. संभाजीनगरमधील विष पिऊन आत्महत्या केलेल्या तरूणाने सुसाईड नोट लिहिली आहे. ही सुसाईड नोट नातेवाईकांना आणि पोलिसांना सापडल्याने मराठा आरक्षणामुळे आत्महत्या केल्याचं कारण आता समोर आलं आहे

हे ही वाचा

राज्यात पोलिस भरती होणार; फडणवीसांची घोषणा

रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून काही मागण्या

गौतमी पाटीलला हवंय मराठा आरक्षण

काय आहे सुसाईड नोटमध्ये?

सुसाईड नोटमध्ये येणाऱ्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मी आत्महत्या करत आहे, अशा आशयाचा मजकूर चिठ्ठीत लिहिला होता. माझ्या मुलांना शिकवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध असताना माझ्या मुलांना आरक्षण नसल्याने मी काही करू शकत नाही. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मी आत्महत्या करत आहे. अशी चिट्ठी लिहून आत्महत्या केली.

त्याला गावकरी आणि नातेवाईकांनी फुलंब्री येथील रूग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकृती आणखीन खालवल्याने त्याला छ. संभाजीनगरमधील घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. याचवेळी डॉक्टरांनी त्याला तपासताच मृत घोषित केलं

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी