भारतात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोकं राहतात. देश तसा वेश ही म्हण आपल्याला माहिती असेलच. देशामध्ये किमीच्या अंतरावर माणसांची भाषा, आहारामध्ये बदल दिसतो. मात्र मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबादसारख्या शहरात सर्व धर्मांचे लोक राहत असतात. त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग देखील होत असते. अनेक लोकं ऑनलाईद्वारे खाद्यपदार्थ मागवतात. मात्र आता मुंबईमध्ये स्विगी आणि झोमॅटो सारख्या ऑनलाईन कंपन्या असल्याने मुंबईप्रमाणे इतर राज्यातील लोकं ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवत वेळेची बचत करतात. या स्विगीच्या माध्यमातून एका खवय्याने तब्बल ४२ लाखांचे खाद्यपदार्थ मागवले आहेत. याची सर्वत्र चर्चा असून ही माहिती स्विगीने दिली आहे.
हाऊ इंडिया स्विगी इन २०२३ स्विगीचा वार्षिक अहवाल
हाऊ इंडिया स्विगी इन २०२३ या अहवालात स्विगीकडून प्रत्येक वर्षाच्या अखेरीस गेल्या १२ महिन्यात घडलेल्या खास गोष्टींची माहिती दिली जाते. गुरूवारी स्विगीने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील एका व्यक्तीने तब्बल ४२ लाख ऑनलाईन खाद्य पदार्थावर खर्च केले, अशी अनोखी माहिती स्विगीने बारा महिन्यात दिली आहे. मात्र स्विगीने त्या व्यक्तीचं नाव सांगितलं नाही. त्याने इतरही ठिकाणाहून जेवण मागवले.
ऑनलाईन फुड डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी या प्लॅटफॉर्मवर १० हजाराहून अधिक ऑर्डर दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद येथे खवय्यांकडून करण्यात आल्या आहेत. सर्वाधिक मागणी ही केक, गुलाबजामून, पिझ्झा अशा वेगवेगळ्या पदार्थांवर करण्यात आली आहे. मात्र याहून अधिक मागणी ही बिर्याणीला आहे. तर वेज बिर्याणीची देखील ऑर्डर केली जाते.
Hyderabad’s Culinary Chronicles.#Swiggy #Biryani #Hyderabad pic.twitter.com/xjMBwoMuJK
— Wirally (@GoWirally) December 15, 2023
हे ही वाचा
श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; अँजिओप्लास्टीनं तब्येतीत सुधार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर विष पिऊन मराठा बांधवाची आत्महत्या
भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान बिर्याणीची क्रेझ
भारत-पाकिस्तान सामना असताना बिर्याणीची अधिक क्रेझ आहे. चंदीगडमधील एका परिवाराने ७० प्लेट बिर्याणी ऑर्डर केली होती. झाशीमध्ये एका व्यक्तीने २६९ वस्तूंची ऑर्डर केली. भुवनेश्वरमध्ये २०७ पिझ्झा ऑर्डेर केले. दुर्गा पूजेवेळी गुलाबजामूनची सर्वाधिक ऑर्डर झाली होती. तर या ९ दिवसांमध्ये मसाला डोसाची ऑर्डर अधिक आहे.
भारतात सर्वाधिक चिकन बिर्याणीला मागणी
भारतात सर्वाधिक चिकन बिर्याणीची मागणी केली जाते. वर्षभरात सेकंदाला २.५ जण बिर्याणीची ऑर्डर करतात, असा निष्कर्ष आता स्विगीने आपल्या चार्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्याचप्रमाणे सलग आठव्यांदा बिर्याणीची मागणी नोंदवण्यात आली. हैदराबादमध्ये बिर्याणी ही प्रसिद्ध डिश आहे. बिर्याणीची ऑर्डर १ हजार ६३३ जणांनी केली आहे.