गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात पोलिस दलाची सैन्यभरती झाली नाही. यामुळे काही भरतीचा सराव तसेच अभ्यास करणारे तरूण भरतीची वाट पाहूण त्रस्त झाले होते. तरुणांचे वय देखील वाढू लागल्याने वयाचा आणि भरतीचा ताळमेळ लागत नाही. यामुळे तरूणांच्या वाढत्या वयाला घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र आता पोलिस दलात भरती होणाऱ्या तरूणांसाठी महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. गेल्या ७० वर्षात अकृतीबंध झाला नव्हता. जून महिन्यात अकृतीबंध केल्याने पोलिसांची संख्या किती आहे आणि आणखी किती पोलिस सैन्य भरावे लागतील याची माहिती आता समोर आली आहे. त्यानुसार २३ हजार ६२८ पोलिस शिपाई भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महाराष्ट्र पोलिस दलात आता मेघा भरती होणार आहे. पोलिस भरतीची वाट पाहणाऱ्या युवकांना सुटकेचा श्वास मिळणार आहे. ही भरती आकृतीबंध पद्धतीने होणार असून विधान परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला असता फडणवीसांनी पोलिस भरतीबद्दल सांगितलं आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ही भरती होणार असल्याने २३ हजार ६२८ पोलिस शिपाई पदे भरवण्यात येणार आहे.
हे ही वाचा
रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून काही मागण्या
गौतमी पाटीलला हवंय मराठा आरक्षण
नागपूरच्या महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात माथाडी कामगारांचा प्रश्न तापणार !
वयोमर्यादेत वाढ?
पोलिस स्टेशनमधील अंतर किती असावे? त्याचप्रमाणे वाढत्या लोकसंख्येमुळे पोलिस स्टेशनमध्ये किती पोलिस असावेत? असा सर्व आकृतीबंध झाला आहे. प्रथमच असा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे. कोरोना काळात भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे वयाच्या वाढीची मुदत आता संपणार असून ती संपण्याच्या आत नवीन भरती सुरू होणार का? असा विचार करण्यात येणार आहे. याबाबत गृहविभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली.
७० वर्षांनंतर आकृतीबंध
राज्यात ७० वर्षांत आकृतीबंध झाला नव्हता. जून महिन्यात राज्याचा आकृतीबंध करण्यात आला. यामुळे राज्यात पोलिसांची संख्या किती आहे आणि किती संख्या भरण्याची आवश्यकता आहे. याची माहिती आता मिळाली आहे, असे आमदार सतेज पाटील म्हणाले आहेत. यावर फडणवीस यांनी गृह विभागात १९७६ आकृतीबंधानुसार भरती केली जात होती. पोलिस दलात भरतीची प्रक्रिया सुरू आहे. नवीन आकृतीबंधानुसार जागा देखील वाढल्या आहेत. यामुळे आकृतीबंधानुसार पेलिस भरती होणार असल्याची माहिती समोर येत आहे.