31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeराजकीय'भुजबळांनी राजीनामा द्यावा'

‘भुजबळांनी राजीनामा द्यावा’

राज्यात आरक्षणावरून जाती जातीत एकमेकांविरोधात धरपकड सुरू आहे. मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं आहे. तर ओबीसी समाज मराठा बांधवांना सरसकट कुणबी आरक्षण देण्यापासून विरोध करत आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावर काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि छगन भुजभळ (chhagan Bhujbal) यांच्यामध्ये जुंपली आहे. अशातच आता यात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad) यांनी या आरक्षणाच्या मुद्द्याला धरून छगन भुजबळांच्या भाषणावर आवाज उठवला आहे. ते मंत्री असून त्यांनी मंत्रीमंडळात बोलावं. नाहीतर त्यांनी राजीनामा द्यावा, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

जे आधी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलायचे आता तेच ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलत आहेत. इंदिरा सहाणी खटल्याच्या निकालानुसार ओबीसींना आरक्षण देता येत नाही. ओबीसींचे ५० टक्के आरक्षण रद्द होत नाही, हे माहित असूनही भुजबळ एवढ्या सभा का घेत आहात? असा सवाल आता जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे. आम्ही भुजबळांना ओबीसी नेते मानतो, पण त्यांच्या भाषणात अंगार का येतो? आरक्षणासाठी गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांनी खूप प्रयत्न केले आहे. मात्र भुजबळांची भूमिका पटत नाही. ते कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी तिथं जाऊन बोलावं. शांत आणि स्थिर महाराष्ट्र आपण अस्थिर करत आहात.

हे ही वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर विष पिऊन मराठा बांधवाची आत्महत्या

राज्यात पोलिस भरती होणार; फडणवीसांची घोषणा

रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून काही मागण्या

 मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आव्हाडांचा सरकारवर संताप

मराठा आरक्षणावर काही महिन्यांपासून मराठा बांधव आंदोलन करत असून उपोषण ही केलं जात आहे. मात्र अजूनही सरकार काहीच करत नाही. येत्या २४ डिसेंबर दिवशी सरकार काय भूमिका घेणार यावर आता जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहात? तुम्हा लाठीचार्ज का केला? तुम्ही आंदोलन का पेटवलं त्यात तुमचा आंदोलन पेटवण्याचा चुकीचा हेतू होता? यामुळे महाराष्ट्र तुम्हा पेटवला आहे का? असे अनेक सवाल आव्हाडांनी सरकारकडे उपस्थित केले आहेत. लोकसभा निवडणुकीपर्यंत तुम्हाला हे सुरू ठेवायचे आहे का? आधी तुम्ही धर्म समोर केले आणि आता तुम्ही जात समोर करत आहात का? असे अनेक सवाल आव्हाडांनी उपस्थित करत सरकारचे कान टोचले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी