36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeमनोरंजनSuper Bowl 2023 : रिहाना दुसऱ्यांदा गरोदर; लाईव्ह कार्यक्रमात दाखवले बेबी बंप

Super Bowl 2023 : रिहाना दुसऱ्यांदा गरोदर; लाईव्ह कार्यक्रमात दाखवले बेबी बंप

प्रसिद्ध अमेरिकन 34 वर्षीय पॉप गायिका रिहाना (Rihanna) दुसऱ्यांदा गरोदर आहे. पहिल्या बाळंतपणानंतर नऊ महिन्यानंतर पुन्हा एकदा एका कार्यक्रमात ती गरोदर असल्याचे दिसून आले. अमेरिकेतील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या फुटबॉल स्पर्धेच्या ‘सुपर बाउल हैलटाइम शो 2023 (Super Bowl 2023 halftime show) या कार्यक्रमात ती परफॉर्म करत असताना आपल्या पोटावरुन हात फिरवताना दिसून आली. (Rihanna shows baby bump) रिहाना ही अमेरिकेतील सुप्रसिद्ध पॉप गायिका असून ग्रॅमी पुरस्काराची विजेती देखील आहे. रिहानाच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Super Bowl 2023 halftime show Rihanna shows baby bump)

रिहानाची जादू केवळ गाण्यांपूरती नसून ती एक फॅशन आयकॉन देखील आहे. तिच्या फॅशनची तरुणाईवर मोठी भूरळ पडते. मात्र गेल्यावर्षी पहिल्यांदा गरोदर राहिल्यानंतर तीने मे 2022 मध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर आता नऊ महिन्यानंतर पुन्हा ती गरोदर असल्याचे दिसून आले. रिहाना अद्याप अविवाहीत असून तीचा प्रियकर रॉकीसोबत ती राहत आहे. रिहाना आणि रॉकी यांचे हे दुसरे अपत्य असणार आहे.

हे सुद्धा वाचा

स्टीवन स्पीलबर्ग एस.एस. राजामौलींच्या ‘आरआरआर’ चित्रपटावर फिदा!

Bigg Boss 16 Finale: इतिहासात पहिल्यांदाच बिग बॉस विजत्याला मिळणार ‘ही’ मोठी संधी!

अमृता खानविलकर म्हणते, ‘ललिता बाबर’चा चित्रपट हा माझा सर्वोच्च सन्मान

‘सुपर बाउल हैलटाइम शो 2023 मध्ये तीने लाल रंगाचे कपडे परिधान केले होते. यावेळी लाल रंगाचे कपडे परिधान केलेल्या रिहानाने आपल्या पोटावरुन हात फिरवत चाहत्यांना गरोदर असल्याचे संकेत दिले. सन 2021 मध्ये रिहाना आणि रॉकीने एका मुलाखतीत तिच्या आणि रॉकीच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. त्यावेळी रॉकीने रिहानाला माझ्या जीवनातील प्रेम असे संबोधले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी