देशात नवीन संसद बांधून काहीक वर्ष झाली आहेत. मात्र या संसदेत काही दिवसांपूर्वी दोन युवकांनी संसदेच्या गॅलरीतून उडी मारत हल्ला केला होता. यामुळे संसदेत भीतीचे वातावरण तयार झालं होतं. त्या दोन युवकांनी संसदेमध्ये पिवळ्या रंगाच्या धुरांच्या नळकांड्यांचा वापर करत धुर सोडला होता. संसदेतील सर्व कामकाज बंद झाले, यामुळे आता काही दिवसांपासून विरोधी खासदार लोकसभेमध्ये संरक्षणाचा प्रश्न उपस्थित करत आहेत. याप्रकरणी कसून चौकशी करावी असे असे खासदारांनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केल्याने विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि खासदार अमोल कोल्हेदेखील (Amol Kolhe) आहेत. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) संताप व्यक्त केला आहे.
अधिवेशनादरम्यान एकूण ४९ खासदारांना निलंबित करण्यात आलं. त्यामध्ये अमोल कोल्हे आणि खसदार सुप्रिया सुळे देखील आहेत. काही दिवसांपासून निलंबनाचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत एकूण १४१ खासदरांनी निलंबित करण्यात आलं आहे. यावर शरद पवार म्हणाले की, माहिती मागणाऱ्या सदस्यांवर कारवाई होते. मग त्या सुप्रिया सुळे असोत वा अमोल कोल्हे. सुप्रिया सुळे यांना काही वर्षांपासून संसदपटू म्हणून पारितोषिक मिळाले आहे. वेलमध्ये जायचं नाही. नियम तोडायचा नाही. मी ५६ वर्षे राजकारणात आहे पण एकदाही वेलमध्ये गेलो नाही, हे नियम आम्ही पाळतो असे शरद पवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा
‘आईच्या मुलाला कुणबी जातप्रमाणपत्र द्या’
मिचेल स्टार्क आयपीएल लिलावात एकच नंबर; पॅट कमिन्सलाही टाकलं मागे
सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे लोकसभेतून निलंबित
सत्तेचा गौरवापर
काही दिवसांआधी संसदेमध्ये गॅलरीतून दोन तरूणांनी थेट सभागृहात उडी मारली याबाबत शरद पवारांनी सांगत असताना सत्ताधारी पक्षांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, काही लोकांनी सत्ताधारी पक्षांच्या लोकांकडून पास घेऊन संसदेत प्रवेश केला. प्रेक्षक गॅलरीतून उडी टाकली आहे. संसदेत आणि संसदेबाहेर विशिष्ट गॅस सोडायचा प्रयत्न केला. त्यावेळी पाचशेपेक्षा जास्त खासदार होते. त्यामुळे हा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. हे अतिशय गंभीर असून याची माहिती आम्हाला द्या, मात्र ती माहिती देण्याची तयारी सत्ताधारी पक्षाची नाही, सरळ सरळ सत्तेचा गैरवापर आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.