33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदेंचे भाषण सुरु असतांना फडणवीसांनी लावला‘डोक्याला‘ हात

एकनाथ शिंदेंचे भाषण सुरु असतांना फडणवीसांनी लावला‘डोक्याला‘ हात

टीम लय भारी

मुंबईः आज विधानसभेच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस होता.अजित पवारांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे अधिवेशनाचा पूर्वाध हा अजित पवारांच्या भाषणाने गाजला. तर उत्तरार्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भाषणाने गाजला. एकनाथ शिंदेंचे भाषण सुरु असतांना बाजूला बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी अनेक वेळा ‘डोक्याला हात‘ लावला.

त्याला अनेक कारणं आहेत. एकनाथ शिंदेबरोबर काम करतांना फडणवीसांना किती वेळा ‘डोक्याला हात‘ लावावा लागणार आहे, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. एकनाथ शिंदेचे आजचे भाषण त्यांना कोणत्याही पीएने लिहून दिले नसावे असे होते. सभागृहातील भाषणांच्या वेळी पाळायची नितीमुल्यंत्यांच्या भाषणात अजिबात दिसत नव्हती. त्यांच्या प्रत्येक वाक्याला सभागृहात हशा पिकत होता.

ते अतिशय स्पष्टपणे बोलत होते. मात्र जे बोलू नये ते देखील बोलत होते. अनेक घटनांचा उलगडा त्यांच्या भाषणातून होत होता. एकनाथ शिंदेचे हे भाषण म्हणजे ‘ भूतो न भविष्यती‘ असे होते. यापूर्वी या सभागृहात असे भाषण कोणीच केल नव्हते. भांग पिवून आलेल्या माणसाला जशी नशा चढते,तशी आज एकनाथ शिंदेना भाषणाची नशा चढलेली दिसत होती.अनेक वेळा त्यांचा बोलतांना तोल गेला. त्यांचे भाषण हे बोली भाषेतले होते. आपण आपल्या मित्रांच्या टोळक्यात जे शब्द वापरतो तसे शब्द मुख्यमंत्री वापरत होते.

त्यांनी ‘साला‘ वगैरे असे शब्द वापरले. त्यामुळे आता यांची पुढची भाषणं कशी असतील हाच प्रश्न भाषण जनतेला पडला आहे.साला वगैरे शब्द मागे घेतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले. त्यावर जयंत पाटलांनी शब्द मागे घेऊ नका असे सांगितले. हे नैसर्गिकच राहू दया. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपली लय, ताल पुढे कायम ठेवली. त्यांच्या प्रत्येक वाक्यावर हशा पिकत होता.त्यांनी यावेळी अनेकांची फिरकी घेतली. जणू काही विनोदातून ते शब्दांचे आसूड ओढत होते. ते भावूक देखील झालेले पहायला मिळाले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मानसिकता दोलायमान होती. ते आतून प्रचंड अस्वस्थ होते.

हे सुध्दा वाचा:

VIDEO : विरोधी पक्षात बसून अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना झापले

‘फडणवीसांनी अडीच वर्षात सगळी महत्वाची पदं भुषवली‘

माझी टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी