35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्र'सगळं उघड करू नका' म्हणत फडणवीसांनी शिंदेंना जोडले हात

‘सगळं उघड करू नका’ म्हणत फडणवीसांनी शिंदेंना जोडले हात

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणामुळे संपूर्ण सभागृहात हशा पिकला. मुख्यमंत्री यांनी केलेले भाषण हे टोलेबाजीचे असले तरी विरोधकांना देखील आपले हसू आवरता आले नाही. याचवेळी भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यसभेमध्ये संजय पवार कसे पराभूत झाले? हे सांगत असतानाच फडणवीसांनी त्यांना ‘सगळं उघड करू नका’ म्हणत हात जोडले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची एकच जागा कशी निवडून आली याबाबत देखील सांगितले. शिवसेनेचे राज्यसभेवर दोन्ही उमेदवार निवडून यावेत, यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली होती. पण ऐनवेळी आमचा एक उमेदवार पडला. आमच्या सर्व हुशार लोकांनी त्यावेळी मिळणारी मतांची मोजणी केली पण एक उमेदवार कसा पराभूत झाला हे कळू शकले नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘हे सगळं घडवणारे हे आहेत’ असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले.

फडणवीस हे कलाकार आहेत. राज्यसभा निवडणुकीत त्यांनी कोणाचे आमदार फोडले काय माहित नाही, असे देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले. त्यांच्या या वक्तव्यावर मात्र सभागृहात एकच हशा पिकला. यानंतर मुख्यमंत्री सर्व गुपित बाहेर काढतील या भीतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना हात जोडले.

हे सुद्धा वाचा :

एकनाथ शिंदेंचे भाषण सुरु असतांना फडणवीसांनी लावला‘डोक्याला‘ हात

आम्ही निवडणुकीत जिंकून येण्याची चिंता अजितदादांनी करू नये, गुलाबराव पाटील यांचा हल्लाबोल

सभागृहाला शिस्त लावण्याचे काम अध्यक्षांचे : बाळासाहेब थोरात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी