30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीय'90 टक्के शिवसैनिकांशी चांगले संबंध'

’90 टक्के शिवसैनिकांशी चांगले संबंध’

टीम लय भारी

मुंबई : शिवसेना पक्ष उभारणीमध्ये बाळासाहेब ठाकरेंना अनेक नेत्यांनी साथ दिली. त्यापैकी काहींनी मतभेदामुळे शिवसेना सोडली. त्यापैकी नारायण राणे हे एक प्रमुख नेते आहेत. ते आता भाजपवासी आहेत. मात्र शिवसेनेत आपल्यावर झालेल्या अन्यायाची धग त्यांच्या मनात कायम आहे. नेहमीच नारायण राणेंच्या वक्तव्यातून त्याचा प्रत्यय येतो. भाजपमध्ये जावून देखील आपले 90 टक्के शिवसैनिकांशी चांगले संबंध असल्याचे आज पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणेंनी सांगितले.

‘माझे 90 टक्के‘ शिवसैनिकांशी चांगले संबंध आहेत. त्यापैकी एकनाथ शिंदे हे एक आहेत. 50 वर्षे ज्यांनी शिवसेनेत काढली. त्यांना आदेश दिले जातात. त्यातूनच हे बंड तयार झाले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना कायदे, नियम माहित नाही. त्यामुळे त्यांनी सरकार अल्पमतात आल्यानंतर देखील राजीनामा दिला नाही.
एकनाथ शिंदेंनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. आनंद दिघेंच्या बाबतीत घडले ते तुमच्या बाबतीत घडले असते. प्रसंगी घेतलेला निर्णय योग्य आहे. हिंदुत्ववादी विचारांनी तुमची जडणघडण झाली आहे. ही राज्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. उध्दव ठाकरेंच्या सूडाची भावना, विरोधकांना अपशब्द बोलायच्या सवयीवर देखील त्यांनी टीका केली.

अनेक वेळा शब्द देवून शब्द फिरवला. त्यातून त्यांच्यात बंडाची आग पेटली असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. वारंवार अपमान झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. एकनाथ शिंदेंना दिले गेलेले नगर विकास मंत्री पद हे नामधारी होते. बाळासाहेबांचा एक गुण उध्दव ठाकरेंमध्ये नाही. एकनाथ शिंदे बरोबर उध्दव ठाकरेनी संवाद साधला नाही. प्रेमाने बोलले नाही. समजावून सांगितले नाही, त्यामुळेच त्यांनी बंडखोरी केली. संजय राऊतांनीच शिवसेना संपवली, असा खोचक टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

हे सुद्धा वाचा :

आनंद दिघे, एकनाथ शिंदे नंतर ठाण्याची धूरा कोणाकडे

शिवसैनिकांनी दिला गद्दारांना शाप

एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद हवे होते

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी