29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeएज्युकेशन'विद्यार्थ्यांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत' आरोग्य विभागाच्या घोटाळ्यावरुन...

‘विद्यार्थ्यांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत’ आरोग्य विभागाच्या घोटाळ्यावरुन गोपीचंद पडळकर संतप्त

टीम लय भारी

मुंबई : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोग्य विभागातील घोटाळ्यावरुन ठाकरे सरकारला घेरले आहे. आरोग्य मंत्र्यांचे कारनामे आरोग्य विभागाच्या पदभरती घोटाळ्यामुळे आता पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेत, असा दावा पडळकरांनी यावेळी केला आहे(Gopichand Padalkar angry over health department scam). 

‘प्रशासनात आपल्याच मर्जीतले-ताटाखालचे अधिकारी बसवून त्याच्या मार्फत ब्लॅक लिस्टेट कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षांची कंत्राटे द्यायची, जेणेकरुन पदभरतीमध्ये वसूलीचा घोडेबाजार चालवण्याची आघाडी सरकारची परंपरा राखता आली पाहिजे. आरोग्यमंत्र्यांचे हे कारनामे आरोग्य विभागाच्या पदभरती घोटाळ्यामुळे आता पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेत. हे सरकार आता अधिकृतरित्या वसूली सरकार म्हणून मान्यता प्राप्त झालेले आहे’ असे गंभीर आरोप गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर केले आहेत.

गोपीचंद पडळकरांच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही सहन करणार नाही

हा तर शिक्षण व्यवस्था मोडित काढण्याचा ठाकरे सरकारचा डाव; भाजपचा हल्लाबोल

गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘होतकरू विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत  पोहचलेले आहेत. आणि या पेपर फुटीच्या लिंक आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहचल्या आहेत. म्हणजे या सगळ्या घोटाळेबाजीला राज्य सरकारचेच अभय होते का? असा सवाल आता महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये उपस्थित होतोय.

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये थेट सामना

BJP blames minister Rajesh Tope for Maharashtra health dept paper leak

आरोग्य मंत्र्यांचा व घोटाळेबाजाचा संबंध नेमका काय आहे? हे जनतेला कळायला हवे. हे प्रकरण म्हणजे सगळी यंत्रणाच पोखरलेली आहे, या गंभीर घोटाळ्याची आरोग्य मंत्र्यांसहीत न्यायलयीन चौकशी झालीच पाहिजे. जर, राज्य सरकारने याबाबत टाळाटाळ केली तर आम्हीच हा घोटाळा सीबीआयकडे घेऊन जाऊ, असा इशारा देखील पडळकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी