35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यCoronavirus : कोरोनापासून बचावासाठी कर्तव्यावरील पोलिसांना मोफत औषध वाटप

Coronavirus : कोरोनापासून बचावासाठी कर्तव्यावरील पोलिसांना मोफत औषध वाटप

टीम लय भारी

मुंबई : कोरोना (Coronavirus) नावाच्या राक्षसाने संपूर्ण जग आपल्या कवेत घेतले असुन भारतातही तो झपाट्याने पसरत आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रातही आरोग्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये खूप मोठी दिलासादायक बातमी आहे की होमिओपॅथी औषधाने कोरोना विषाणु (Coronavirus) पासुन होणारा संसर्ग रोखण्यासाठी शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते, हे सिद्ध झाले आहे.

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने होमिओपॅथीचे औषध Arsenic album 30 या औषधाची शिफारस केलेली आहे. या औषधामुळे रोग प्रतिकार शक्ती (Immunity) वाढवते व कोरोनापासून (Coronavirus) बचाव होतो. ‘लॉकडाऊन’च्या काळात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना मोफत होमिओपॅथिक औषधे वाटप करून या डॉक्टरने सामाजिक बांधिलकी जपली आहे.

Coronavirus : कोरोनापासून बचावासाठी कर्तव्यावरील पोलिसांना मोफत औषध वाटप

केरळ तसेच इतर 8 राज्यांनी हेच औषध लाखो लोकांना वाटल्याने (Coronavirus) या रोगाचा प्रसार थांबला व त्यामुळे कोरोनावर उत्तम रित्या नियंत्रण आणलेले आहे.

Coronavirus : कोरोनापासून बचावासाठी कर्तव्यावरील पोलिसांना मोफत औषध वाटप

आपणही हे औषध होमिओपॅथी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे. यामुळे कोरोनापासून (Coronavirus) संरक्षण मिळण्यासाठी मदत होते. तान्ह्या बाळांना व लहान मुलांना आणि गरोदर स्त्रियांनासुद्धा 4 गोळ्या एकदा असे 3 दिवस असा डोस द्यावा.

या औषधाचे कोणतेही साईड इफेक्ट्स नसून ब्लड प्रेशर, डायबेटीस इत्यादी आजार असलेल्यांनी त्यांच्या औषधांसोबत बिनधोकपणे हे औषध घेता येईल, असे कांदिवली येथील डॉ. दिपा बंडगर यांनी सांगितले.

लोकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी आपले आयुष्य धोक्यात घालून पोलिसांचा बंदोबस्त सुरू आहे. त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी ही औषधे देत असल्याचे डॉ. दिपा बंडगर यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी