35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यतुम्ही पण घरी वॅक्सिंग करत असाल, तर 'या' गोष्टींची घ्या काळजी 

तुम्ही पण घरी वॅक्सिंग करत असाल, तर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी 

महिला आपल्या सुंदरता आणि आपल्या शरीराची खूप काळजी घेतात. त्या नेहमी सुंदर दिसण्यासाठी काही न काही करत असतात. कुठल्या कार्यक्रमासाठी तयार होतांना त्या डोक्यापासून तर पायापर्यंत काय घालायचं याच सर्व विचार करून ठेवतात. (Beauty Tips Take care of these things while waxing) पण अशा वेळी त्यांना एका अशा समस्याला सामोरे जावं लागते, ज्याला घेऊन त्या नेहमी त्रासात असतात. ती समस्या म्हणजे शरीरावर नको असलेले केस. महिलांना या नको असलेल्या केसांचं खूप त्रास असतो. त्यामुळे हा त्रास दूर करण्यासाठी बहुतेक स्त्रिया वॅक्सिंगला सर्वोत्तम पर्याय मानतात. (Beauty Tips Take care of these things while waxing)

महिला आपल्या सुंदरता आणि आपल्या शरीराची खूप काळजी घेतात. त्या नेहमी सुंदर दिसण्यासाठी काही न काही करत असतात. कुठल्या कार्यक्रमासाठी तयार होतांना त्या डोक्यापासून तर पायापर्यंत काय घालायचं याच सर्व विचार करून ठेवतात. (Beauty Tips Take care of these things while waxing) पण अशा वेळी त्यांना एका अशा समस्याला सामोरे जावं लागते, ज्याला घेऊन त्या नेहमी त्रासात असतात. ती समस्या म्हणजे शरीरावर नको असलेले केस. महिलांना या नको असलेल्या केसांचं खूप त्रास असतो. त्यामुळे हा त्रास दूर करण्यासाठी बहुतेक स्त्रिया वॅक्सिंगला सर्वोत्तम पर्याय मानतात. (Beauty Tips Take care of these things while waxing)

एप्रिल महिन्यात भारतातील ‘या’ ठिकाणी एन्जॉय करा सुट्ट्या, कुटुंबियांसोबत घालवा वेळ

पाहिले तर केस काढण्याची सर्वात प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारी पद्धत म्हणजे वॅक्सिंग. कारण त्याचा परिणाम शेव्हिंग, हेअर रिमूव्हल क्रीम इत्यादींपेक्षा चांगला आहे. मात्र या महागाईच्या जमान्यात आणि वेळेअभावी सर्वच महिलांना पार्लरमध्ये जाणे शक्य होत नाही. त्यांना घरी स्वतः वॅक्सिंग करण्याचा पर्याय उरला आहे. पण हे नाकारून चालणार नाही की घरी वॅक्सिंग करणाऱ्या महिलांना माहिती नसल्यामुळे त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वॅक्सिंगचे बरोबर रीतीने करणे गरजेचे आहे. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही टिप्स… (Beauty Tips Take care of these things while waxing)

जाणून घ्या दीपिकाच्या प्रेग्नेंसी डाएटबद्दल

जर तुम्ही घरी वॅक्सिंग करत असाल तर तुम्हाला आधी तुमची त्वचा व्यवस्थित स्वच्छ करावी लागेल. याचा अर्थ वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचेवर साचलेली घाण, धूळ किंवा घाम स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. यासाठी त्वचा ओल्या टॉवेलने किंवा टिश्यूने स्वच्छ करावी लागेल. नंतर त्वचा पूर्णपणे कोरडी करा. यानंतरच त्वचेवर वॅक्स लावावे. तसे, वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचेवर टॅल्कम पावडर लावल्याने केस काढणे देखील सोपे होईल. (Beauty Tips Take care of these things while waxing)

जर तुम्ही घरी वॅक्सिंग करत असाल तर त्वचेवर वॅक्सचा थर कसा आणि किती लावायचा हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. तथापि, वॅक्सिंग दरम्यान, आपल्या त्वचेच्या प्रत्येक भागावर वॅक्सचा  पातळ थर लावणे आवश्यक आहे. वॅक्सचा पातळ थर तुमचे केस जागी ठेवते आणि ते काढणे सोपे करते. पण एकाच ठिकाणी भरपूर वॅक्स लावल्यास केस पूर्णपणे बाहेर पडत नाहीत आणि जास्त वेदना होतात. ही परिस्थिती टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वॅक्स व्यवस्थित वितळू देणे आणि नंतर त्याचा पातळ थर लावणे. नंतर त्वचेवर हलकेच उबदार वॅक्स लावा आणि पटकन पट्टीने ते काढा. असे केल्याने केस समान रीतीने काढले जातील.

मिरची कापल्यानंतर तुमच्या हाताची जळजळ होते? मग या घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम

वॅक्सिंगची संपूर्ण प्रक्रिया वॅक्सच्या तापमानावर अवलंबून असते. त्यामुळे वॅक्सिंग करताना तापमानाकडे पूर्ण लक्ष देणे गरजेचे आहे. कारण जर तुम्ही त्वचेवर खूप थंड वॅक्स लावले तर त्यात गुठळ्या होतात, ज्यामुळे ते त्वचेवर व्यवस्थित लागू शकत नाही आणि सर्व केस बाहेर पडत नाहीत. उलट, काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान वेदना वाढू शकते. आणि जर वॅक्स खूप गरम असेल तर त्यामुळे तुमची त्वचा जाळण्याचा धोका असतो. म्हणून, त्याचे तापमान माफक प्रमाणात गरम ठेवा, जेणेकरून त्वचा जळणार नाही आणि सर्व केस व्यवस्थित काढले जातील.

सर्व महिलांना वॅक्सिंगच्या वेदना चांगल्या प्रकारे माहित आहेत. आणि या भीतीपोटी, जेव्हा आपण घरी वॅक्सिंग करतो तेव्हा हळूहळू पट्टी काढून टाकतो, तर ही पद्धत चुकीची आहे. वॅक्सिंगमध्ये पट्टी लवकर आणि अचूक काढावी लागते. असे केल्याने वेदनाही कमी होतात आणि सर्व केस एकाच वेळी बाहेर येतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी