30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeआरोग्यगुढी पाडव्यापासून मराठी नूतन वर्ष का सुरु होतो? या दिवशी का खाल्ला...

गुढी पाडव्यापासून मराठी नूतन वर्ष का सुरु होतो? या दिवशी का खाल्ला जातो कडुलिंबाचा प्रसाद? जाणून घेऊया…

गुढी पाडवा ज्याला 'संवत्सर पाडो' म्हणूनही ओळखले जाते. पूर्ण महाराष्ट्रात नवीन वर्षाची सुरुवात किंवा कापणीच्या हंगामाची सुरुवात ह्याच दिवसापासून केली जाते. गुढी म्हणजे हिंदू भगवान ब्रम्हदेवतेचा ध्व्ज किंवा प्रतीक आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्याचा पहिला दिवस. (Gudi Padwa 2024 Marathi New Year neem prasad is eaten on this day) असे मानले जाते की, भगवान ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि हिंदू पौराणिक कथेनुसार दिवस, आठवडे, महिने आणि वर्षे सुरू केली. काहीजण हा एक दिवस मानतात जेव्हा राजा शालिवाहनाने आपला विजय साजरा केला आणि पैठणला परतल्यावर लोकांनी ध्वज फडकावला. मुळात गुढी हे वाईटावरच्या विजयाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. (Gudi Padwa 2024 Marathi New Year neem prasad is eaten on this day) 

गुढी पाडवा ज्याला ‘संवत्सर पाडो’ म्हणूनही ओळखले जाते. पूर्ण महाराष्ट्रात नवीन वर्षाची सुरुवात किंवा कापणीच्या हंगामाची सुरुवात ह्याच दिवसापासून केली जाते. गुढी म्हणजे हिंदू भगवान ब्रम्हदेवतेचा ध्व्ज किंवा प्रतीक आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्याचा पहिला दिवस. (Gudi Padwa 2024 Marathi New Year neem prasad is eaten on this day) असे मानले जाते की, भगवान ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि हिंदू पौराणिक कथेनुसार दिवस, आठवडे, महिने आणि वर्षे सुरू केली. काहीजण हा एक दिवस मानतात जेव्हा राजा शालिवाहनाने आपला विजय साजरा केला आणि पैठणला परतल्यावर लोकांनी ध्वज फडकावला. मुळात गुढी हे वाईटावरच्या विजयाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. (Gudi Padwa 2024 Marathi New Year neem prasad is eaten on this day)

बडीशेपचे पाणी प्यायल्याने आरोग्यास मिळतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या

यावर्षी गुडी पाडवा म्हणजेच मराठी नूतन वर्ष मंगळवार 9 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे . हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो . ह्याच दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारली जाते गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. या दिवशी ब्रम्हध्वज आणि विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. (Gudi Padwa 2024 Marathi New Year neem prasad is eaten on this day)

या दिवसापासून शके 1946 आणि नव संवत्सर 2081 प्रारंभ होईल. शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा होय. या दिवशी सकाळी लवकर उठून घरा बाहेरील अंगणात गुढी उभारली जाते घर सजवलं जात ,रंगोळी काढली जाते ह्याच दिवशी कडुलिंबाच्या पाल्याचा प्रसादही बनवला जातो. गुढी पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो. हा प्रसाद आपल्या आरोग्यासाठी गुणकरी असतो.

आता घरबसल्या मिळवा मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम, फॉलो करा या टिप्स

हा प्रसाद खाण्यामागे शास्त्रीय कारण म्हणजे की कडुलिंबापासून बनवलेला प्रसाद खाल्ल्याने शरीरात शक्तीचे कण पसरतात आणि शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते. केवळ गुढी पाडव्याच्या दिवशीचं नव्हे तर संपूर्ण वर्षभर कडुलिंबाचे सेवन करावे, यासाठी या दिवशी हा प्रसाद बनवला जातो. कडुलिंबाची पाने सेवन केल्याने कोणत्याही प्रकारचा आजार उद्धभवत नाही. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. कडुलिंबाची पाने, फुले, फळे, मुळे आणि खोडाचे सेवन केल्याने पोटातील जंतू दूर होण्यास मदत होते. (Gudi Padwa 2024 Marathi New Year neem prasad is eaten on this day)

उन्हाळयात रिकाम्या पोटी बेलपत्र खाल्ल्याने आरोग्याला होणार अनेक फायदे, जाणून घ्या

याशिवाय कडुलिंबाने अंगावर उठणारी खाज आणि इतर त्वचेसंबंधी तक्रारी दूर होतात. कडुलिंबाच्या सेवनाने निरोगी राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील सर्व रोगराई नष्ट होते. त्यामुळे गुढी पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे फळ, पान किंवा सालीचे सेवन करण्याची प्रथा आहे.

-किर्ती घाग.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी