29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमुंबईएकनाथ शिंदे कुठल्याच बाजूने मुख्यमंत्री वाटत नाहीत

एकनाथ शिंदे कुठल्याच बाजूने मुख्यमंत्री वाटत नाहीत

बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या पश्चात एकनाथ शिंदे साधे आमदारही होऊ शकले नसते. पण उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास टाकला. त्यामुळे एकनाथ शिंदेंची कारकिर्द बहरत गेली.

एकनाथ शिंदे यांची व्यक्तीमत्व मुख्यमंत्री या पदाला शोभत नाही (Eknath Shinde’s personality not Suitable to Maharashtra’s Chief Minister). खरेतर, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची सगळी सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे साधारण २००० सालानंतर दिली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वतःची एक वेगळी टीम तयार केली. यात एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. उद्धव ठाकरे यांनी प्रोत्साहन व पाठींबा दिला म्हणून उद्धव ठाकरे यांची राजकीय कारकिर्द बहरत गेली. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या पश्चात एकनाथ शिंदे साधे आमदारही होऊ शकले नसते. पण उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास टाकला. त्यामुळे एकनाथ शिंदेंची कारकिर्द बहरत गेली. त्याबदल्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व टिकवायचे असल्याचा कांगावा करीत एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या सुपुत्राचे सरकार पाडले. इतकेच नाही, तर बाळासाहेबांच्या सुपुत्राला जनतेने मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीत बसवले होते. त्या खूर्चीत स्वतःच जावून बसण्याचे पाप एकनाथ शिंदे यांनी केले. मुळातच एकनाथ शिंदे यांची प्रतिमा एवढी लेचीपेची आहे की, त्यांना मुख्यमंत्री म्हणून स्विकारण्यात महाराष्ट्राच्या जनतेची मानसिकता नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी