31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeराजकीयअखेर साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना भाजपची उमेदवारी जाहीर

अखेर साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना भाजपची उमेदवारी जाहीर

अखेर साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना भाजपची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.(Udayanraje Bhosle announced ticket from BJP Satara Lok Sabha) अजित पवार गटाचा दावा असलेल्या जागेवर भाजपच्या तिकिटावर उदयनराजे लढणार आहेत. 2019 मध्ये ते राष्ट्रवादीतून लढले त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी राजीनामा देत भाजपमध्ये गेले पण पोटनिवडणुकीत पराभव झाला. आता साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत पाहायला मिळणार आहे. 

Image

सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी उदयनराजे भोसले सुरूवातीपासून प्रयत्न करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. गेल्या महिन्यात त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांचीही भेट घेतली होती.

सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी अजित पवार गटाची मागणी होती. पण, उदयनराजे भोसले यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर उदयनराजे भोसले कमळ चिन्हावरच निवडणूक लढवणार हे स्पष्ट केलं होतं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी