30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeआरोग्यउन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचा प्लॅन करताय? तर ही आहेत सर्वोत्तम ठिकाण

उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचा प्लॅन करताय? तर ही आहेत सर्वोत्तम ठिकाण

उन्हाळा आला की सर्वांना वेड लागतात ते फिरायला जायचे लहान मूल असो किंवा मोठी माणसं प्रत्येकालाच ऊन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचं असत पण एवढ्या रखरखीत उन्हात नेमकं कुठे फिरायला जायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. (Summer Vacation trip india best places) तुम्हीही कुठेतरी फिरायला जायची तयारी करत असाल तर तुम्ही भारतातील काही सुंदर आणि उत्तम ठिकाणे एक्सप्लोर करा तर आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये भेट देण्याची चांगली आणि तुम्हाला आवडतील अशी ठिकाण सांगणार आहोत. (Summer Vacation trip india best places)

उन्हाळा आला की सर्वांना वेड लागतात ते फिरायला जायचे लहान मूल असो किंवा मोठी माणसं प्रत्येकालाच ऊन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचं असत पण एवढ्या रखरखीत उन्हात नेमकं कुठे फिरायला जायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. (Summer Vacation trip india best places) तुम्हीही कुठेतरी फिरायला जायची तयारी करत असाल तर तुम्ही भारतातील काही सुंदर आणि उत्तम ठिकाणे एक्सप्लोर करा तर आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये भेट देण्याची चांगली आणि तुम्हाला आवडतील अशी ठिकाण सांगणार आहोत. (Summer Vacation trip india best places)

ह्यात सगळ्यात पहिल्या नंबरला येते ते म्हणजे भारतातील हिल स्टेशन जिथे पर्वत आणि मैदानी प्रदेशातून येणारे थंड वारे तुम्हाला एक वेगळीच सुखद अनुभूती देतात. आता तुम्ही विचार करत असाल की थंड हवेची ठिकाणे तर खूप आहेत. मग अशी कोणती हिल स्टेशन्स आहेत, जिथे आपण , मित्र आणि आपल्या कुटुंबासह जाऊ शकतो. आज आपण अशाच काही ठिकाणांची माहिती घेऊयात. (Summer Vacation trip india best places)

उन्हाळ्यात आंबा खाताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

अरुणाचल प्रदेशातील मंत्रमुग्ध करणारे तवांग शहर 2,669 किमी उंचीवर वसलेले आहे. हिमालयाचे शिखर ह्या ठिकाणाला आणखीनच आकर्षक बनवते. तुम्हाला तवांगचा बराचसा भाग बर्फाच्या चादरीने वेढलेला दिसेल. तवांग हे उन्हाळ्यात भेट देण्याचे एक अतिशय आकर्षक ठिकाण आहे, जिथे तुम्हाला खोल दर्‍या, मठ, पर्वत शिखर आणि धबधबे यासह अनेक गोष्टी पाहायला मिळतील. तवांग शहर हे मे महिन्यात भेट देण्याचे उत्तम ठिकाण आहे. (Summer Vacation trip india best places)

फ्रिजमध्ये ‘हे’ पदार्थ चुकूनही ठेवू नका

त्यानंतर दुसरं ठिकाण आहे उटी. उटीचे नाव ऐकताच डोळ्यासमोर हिरवेगार आणि सुंदर पर्वत आले असतील, उटी हे असे ठिकाण आहे, जे पाहून तुमच्या डोळ्यांचं पारणं फिटेल . ऊटीला भेट देण्यासाठी मे हा सर्वोत्तम महिना आहे.तामिळनाडूच्या निलगिरी टेकड्यांमध्ये वसलेले उटी . ऊटीला  “हिल स्टेशन्सची राणी” म्हणून देखील ओळखले जाते, हिरव्या चहाच्या बागा, मोठे कुरण आणि उंच पर्वत असलेले हे एक स्वप्नवत ठिकाण आहे. उटीमध्ये, तुम्ही दोड्डाबोट्टा शिखर आणि टायगर हिलला  जरूर भेट दिली पाहिजे. येथे दिसणारे दृश्य तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. यासोबतच धबधबे आणि तलाव, चहाच्या बागा, डोंगरावरील रंगीबेरंगी फुलेही पाहायला मिळतील, हे नैसर्गिक सौंदर्य अनुभवायला तुम्ही उटीला नक्की भेट द्या.

उन्हाळ्यात ‘या’ फळांचे करा सेवन अन् मिळवा चमकदार त्वचा

गुलमर्ग हे मे महिन्यात आणि हिवाळयात भेट देण्याचे उत्तम ठिकाण आहे. काश्मीरमधील पृथ्वीचे नंदनवन  म्हणून ओळखले जाणारे शहर म्हणजे गुलमर्ग . तुम्हाला  उन्हाळ्यात गुलमर्ग  हा फुलांनी झाकलेला दिसेल. जिथे पाहाल तिथे फुलांची चादर पसरलेली दिसेल  तुमची नजर जिकडे जाईल तिकडे तुम्हाला रंगीबेरंगी फुलांनी  डोळ्यांचं पारणं फेडणारा खरोखरच्या फुलांचा देखावा पाहायला मिळेल  काश्मीरमधील समुद्रसपाटीपासून  2,730 मीटर उंचीवर असलेले गुलमर्ग चारही बाजूंनी हिमालयाने वेढलेले आहे. मे महिन्यात भेट देण्यासाठी हे काश्मीरमधील एक अद्भुत ठिकाण आहे.

गुलमर्ग ला पृथ्वीवरील स्वर्ग” म्हणून देखील  ओळखले जाते, तुम्हाला येथे बर्फाच्छादित पर्वत, अंतहीन कुरण आणि सुंदर पाइन जंगले पाहायला मिळतील हिवाळा असो किंवा उन्हाळा, हे ठिकाण नेहमीच  मनाला शांती देते  हिवाळ्यात, हे एक बर्फाच्छादित प्रदेश आहे आणि उन्हाळ्यात, ते रंगीबेरंगी फुलणारी फुले आणि थंड हवामानासह हिरव्यागार आश्रयस्थानात बदलते. द गुलमर्ग बायोस्फीअर रिझर्व्हमध्ये विविध वनस्पती आणि प्राणी देखील आपल्याला पाहायला मिळतील हे निसर्ग प्रेमींसाठी योग्य  ठिकाण आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी