26 C
Mumbai
Friday, December 8, 2023
घरआरोग्यमुंबईसह राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाची हजेरी; आरोग्य सांभाळा

मुंबईसह राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाची हजेरी; आरोग्य सांभाळा

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळं मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याच्या झळा जाणवत आहेत. वातावरणातील उकडा वाढल्यामुळं घामाच्या धारा लागताना दिसत आहेत. अशातच हवामान खात्याने (India Meteorological Department) अवकाळी पावसाचा अंदाज दिला होता. त्यानुसार मुंबईसह परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. यामुळे मानवी आरोग्यासही परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 मार्च ते 18 मार्च या दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Weather News)

मार्च महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झालेला असताना ऐन उन्हाळ्यात राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. बुलढाणा जिल्ह्यासह परभणीत जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच परभणी, अकोला, बुलढाणा, सातारा, धुळे, वर्धा, अमरावती या जिल्ह्यातही पाऊस बरसत आहे. सध्या गहू, हरभरा, कांदा काढणीचे दिवस आहेत. मात्र, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे.

सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरु आहेत. अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. याशिवाय ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं आता आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळं कांदा, मका व भाजीपाल्यांच्या पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

पाण्यातून प्रादुर्भाव होणाऱ्या आजारांमधील सामायिक लक्षणे 

 • सतत उलट्या, जुलाब होणे
 • ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी
 • गळून गेल्यासारखे होणे
 • स्त्रियांमध्ये हात-पाय खूप दुखणे, मुलांमध्ये पोट दुखण्याचा त्रास जाणवतो
 • शौचामध्ये आमांश पडणे
 • तापाची मुदत वाढत जाणे, डोळे लालसर होणे
 • खूप थकवा येणे

उपचार 

 • आजार अंगावर काढू नयेत
 • घरगुती औषधांवर चालढकल न करता डॉक्टरांकडून औषधोपचार घ्यावा
 • औषधांचा पूर्ण कोर्स घ्यावा
 • गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तचाचणी करावी.

आजाराची ही लक्षणे आढळल्यास प्राथमिक स्वरुपात ओआरएसचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. ओआरएस उपलब्ध नसल्यास हलका आहार घ्यावा. भाताची पेज, सरबत, ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी आदी भरपूर प्रमाणात सेवन करावे.

हे सुद्धा वाचा :

येत्या 3-4 दिवसांत मुंबईसह राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

ढगाळ वातावरण…उन्हाळ्यात पावसाचा दणका! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

कोकण किनारपट्टीला उन्हाच्या झळा; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी