33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयकिसान सभेच्या शिष्टमंडळासोबत आज मुख्यमंत्र्यांची बैठक; तोडगा न निघाल्यास मोर्चेकरी घेणार 'हा'...

किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत आज मुख्यमंत्र्यांची बैठक; तोडगा न निघाल्यास मोर्चेकरी घेणार ‘हा’ निर्णय

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जेपी गावित यांच्या नेतृत्वाखाली  काढण्यात आलेला मोर्चा मुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहे. ठाणे जिल्ह्यात हा मोर्चा दाखल झाला आहे. आज अखेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज दुपारच्या दरम्यान किसान मोर्चातील प्रतिनिधींना पुन्हा भेटणार आहेत. विशेषतः किसान सभेच्या मोर्चाचे शिष्टमंडळ मुंबईत जाणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी मोर्चाच्या ठिकाणी यावे, अशी भूमिका गावित यांनी घेतली होती.

राज्य सरकारचे प्रतिनिधी मंत्री दादा भुसे आणि मंत्री अतुल सावे यांची काल (15 मार्च रोजी) अखिल भारतीय किसान सभेच्या (All India Kisan Sabha) नेत्यांसोबत बैठक झाली होती. पण ही बैठक आणि चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आज दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रालयातच या शिष्टमंडळाला भेटण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. आम्ही 14-15 मागण्या मांडल्या आहेत आणि त्याबाबत सरकारशी चर्चा करणार आहोत,” असे आंदोलक शेतकरी म्हणाले. दरम्यान या बैठकीत तोडगा निघाला नाही तर, हा लाँग मार्च विधानभवनावर धडकणार असल्याचे मोर्चातील प्रतिनिधी माजी आमदार जे.पी. गावित यांनी स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करा, कांद्याला भाव द्या, जुनी पेन्शन लागू करा, आदिवासींच्या जमिनी नावावर करा, शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या, या मागण्यांसाठी ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला आणखी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने भव्य राज्यव्यापी पायी लाँग मार्च नाशिक येथून मुंबईच्या दिशेने काढण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :

लाल वादळाची कसारा घाटातून मुंबईच्या दिशेने वाटचाल

पुन्हा एकदा मुंबईत लाल वादळ धडकणार; राज्यात शेतकरी आंदोलनाचा एल्गार

18 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर; सरकारी विभागांचे कामकाज ठप्प

दरम्यान या आंदोलनाचे प्रमाण लक्षात घेता, आणीबाणीच्या प्रसंगी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही पुरेसा पोलीस तैनात केला आहे. नाशिक ते मुंबई अशी पायी मोर्चा काढण्यात येत असल्याने आम्ही दोन मार्गात वाहतूक नियंत्रणासाठी आणि कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी फौजफाटा तैनात केला आहे, अशी माहिती DCP किरणकुमार चव्हाण यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी