29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रशिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे वेतनश्रेनीच्या लाभापासून अनेक शिक्षक वंचित

शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे वेतनश्रेनीच्या लाभापासून अनेक शिक्षक वंचित

टीम लय भारी

महाराष्ट्र:  राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना १२ आणि २४ वर्षे वेतनश्रेणीचे लाभ, प्रशिक्षण न झाल्यामुळे मिळत नाहीत. गेली अनेक वर्षे शिक्षण विभागाने प्रशिक्षणाचे आयोजन न केल्याने हजारो शिक्षक वेतनश्रेणीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. शिक्षकांना वेतनश्रेणीचे लाभ सुरु करा या मागणीसाठी काल आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या वतीने राज्याच्या शिक्षण आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे (Shubhash More) यांनी सांगितलं आहे.(kapil patil sent to letter education department maharashtra )

शिक्षण विभागाने (education department maharashtra) दहा दिवसाच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी तयार केलेल्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत २,०००/- प्रशिक्षण शुल्क भरून राज्यभरातील लाखो शिक्षकांनी नोंदणी केली आहे. परंतु अद्यापी ऑनलाईन प्रशिक्षणाचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही.(kapil patil)  ऑनलाईन नोंदणी करणारा प्रत्येक शिक्षक प्रशिक्षण घेण्यास तयार आहे. परंतु तांत्रिक अडचणींमुळे प्रशिक्षण सुरु होऊ शकलेले नाही, असंही पत्रात म्हटलं आहे.(kapil patil)

शिक्षण विभागाची (education department maharashtra) ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याची संपूर्ण तयारी ज्यादिवशी पूर्ण होईल त्यादिवशी नोंदणी करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला प्रशिक्षण घेणे अनिवार्य असणार आहे. तसेच हे प्रशिक्षण घेण्यास सर्व शिक्षकही तयार आहेत. परंतु तुमचं ऑनलाईन प्रशिक्षण सुरु होत नाही म्हणून १२ आणि २४ वर्षे वेतनश्रेणीपासून शिक्षकांनी किती काळ वंचित राहायचं? हा खरा सवाल आहे. याबाबत तातडीने निर्णय होण्यासाठी आमदार कपिल पाटील (Kapil patil)शिक्षण मंत्र्यांकडेही पाठपुरावा करत आहेत, असं सुभाष मोरे यांनी सांगितलं आहे.

हे सुध्दा वाचा:

Only schools that could not complete the syllabus should continue till April end: Maharashtra Education Department

‘विद्यार्थ्यांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत’ आरोग्य विभागाच्या घोटाळ्यावरुन गोपीचंद पडळकर संतप्त

Ground breaking ceremony held for 2 Nashik projects

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी