33 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रडिजिटल साक्षरता आणि जागरूकतेच्या दृष्टीने मेटाची महाराष्ट्र सायबर सोबत भागीदारी

डिजिटल साक्षरता आणि जागरूकतेच्या दृष्टीने मेटाची महाराष्ट्र सायबर सोबत भागीदारी

टीम लय भारी

 

मुंबई : अधिक सुरक्षित ऑनलाइन वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्रातील किशोरवयीन व तरुणांसाठी डिजिटल साक्षरता आणि जागरूकता कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी मेटाने महाराष्ट्र सायबरसोबत भागीदारी केली आहे. वुई थिंक डिजिटल (Meta’s We Think Digital)  हा कार्यक्रम डिजिटल सुरक्षिततेच्या सर्वोत्तम पद्धतींवर लक्ष केंद्रित करेल आणि तरुणांना डिजिटल साक्षरता जागरुकता यावरील सत्रे, प्रशिक्षण संसाधने, ज्ञान भांडार, ज्यामध्ये बाल आणि प्रौढ सुरक्षा स्वयं-सहाय्य्य सामग्री, सुरक्षा व्हिडिओ, संसाधने आणि सहाय्यक मार्गदर्शिका यांचा समावेश आहे, या सर्वांमध्ये सुलभ प्रवेश प्रदान करेल. (Meta’s partnership with Maharashtra Cyber)

या कार्यक्रमाच्या शुभारंभासोबतच, वाढत्या सायबर-गुन्ह्यांविषयी जागरूकतेचा प्रसार करून सुरक्षित ऑनलाइन वर्तन वाढीस लावणे आणि ऑनलाइन अपाय हाताळण्यासाठी किशोरांना साधने आणि संसाधने यासह सुसज्ज करणे हे मेटाचे उद्दिष्ट आहे. प्रशिक्षण मॉड्युल सायबर सुरक्षिततेच्या सर्व पैलूंवर आणि डिजिटल साक्षरतेच्या मुलभूत बाबींवर लक्ष केंद्रित करेल, ज्यामध्ये इंटरनेट ब्राउझ करणे, सायबर गुंडगिरी (सायबर बुलिइंग), लैंगिक छळ (सेक्सटॉर्शन), डार्कनेट सेवा, ट्रोलिंग, ओळख चोरी (आयडेंटिटी थेफ्ट) इ. बाबी आहेत.

या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी आपले विचार मांडताना, महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) यशस्वी यादव म्हणाले, “तंत्रज्ञान आणि इंटरनेटने अनेकांचे जीवन सक्षम केले असताना, सायबर गुन्ह्यांच्या  वाढत्या संख्येने, या गुन्ह्यांमुळे प्रभावित झालेल्यांच्या जीवनावर अपरिवर्तनीय परिणाम होणे सुरूच आहे. आज अधिकाधिक तरुण इंटरनेटचा वापर करत आहेत आणि त्यांना विविध डिजिटल व्यासपीठांवर प्रवेश उपलब्ध आहे आणि म्हणून आपण त्यांना शक्तिशाली साधने, संसाधने आणि ज्ञान प्रदान करणे अत्यावश्यक आहे, जे त्यांना ऑनलाइन सुरक्षित राहण्यास सहाय्यभूत होतील. या उपक्रमाचे नेतृत्व करण्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत डिजिटल साक्षरता नेण्यासाठी आमच्यासोबत भागीदारी केल्याबद्दल आम्ही मेटाची प्रशंसा करू इच्छितो.”

मेटाच्या वुई थिंक डिजिटल या उपक्रमावर उभारलेली, ही भागीदारी महाराष्ट्रातील इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांचा समावेश असलेल्या विविध शाळा आणि महाविद्यालयांतील सुमारे १०,००० तरुणांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवते. यापूर्वी, मेटाने दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि आसाममधील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये असेच प्रशिक्षण आणि कार्यक्रम संचालित केले आहेत. मेटाचे वुई थिंक डिजिटल (We Think Digital) हे, डिजिटल नागरिकांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांची रूपरेषा प्रदान करते, त्यांना त्यांचे  डिजिटल वर्तन आणि परस्परसंवाद याविषयी गंभीरपणे विचार करण्यास आणि ऑनलाइन जगातून अधिकाधिक घेण्यास प्रोत्साहित करते. संपूर्ण भारतभरातील तज्ञांसोबत भागीदारीत काम करताना, वुई थिंक डिजिटल, डिजिटल जगासाठी कौशल्याने सुसज्ज जबाबदार डिजिटल नागरिकांचा जागतिक समुदाय तयार करण्याकरिता संसाधने प्रदान करते.

सदर सहयोगाविषयी बोलताना, ट्रस्ट अँड सेफ्टी, फेसबुक इंडियाचे (मेटा) प्रमुख सत्य यादव म्हणाले, “जेव्हा तरुण लोकांबाबत विचार केला जातो तेव्हा आमची व्यासपीठे ही वयानुरूप उचित सुरक्षितता निर्माण करण्यासोबतच जबाबदार सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. तरुणांना सुरक्षित वाटण्यासोबतच आमच्या व्यासपीठाचा लाभ त्यांना मिळावा हे सुनिश्चित करण्याकरिता आम्ही सतत नवनवीन तंत्रज्ञान संशोधित करत आहोत. २०१९ च्या अहवालानुसार, भारतातील सुमारे ३१ टक्‍के इंटरनेट वापरकर्ते हे १२-१९ वयोगटातील होते. हे लक्षात घेऊन, ही भागीदारी एक अशी परिसंस्था तयार करेल जी तरुणांना इंटरनेटचा, जे केवळ सुरक्षितच नव्हे तर त्यांना वाढण्यास सक्षम देखील करेल, उपयोग करण्याविषयी शिक्षित करण्यास मदत करेल.”

मेटाने नेहमीच वयास अनुरूप उपाय आणि उत्पादने सादर करण्याच्या दिशेने तांत्रिक नवकल्पना अंमलात आणल्या आहेत. या वचनबद्धतेच्या अनुषंगाने मेटाने २०२० मध्ये, मुलांना त्यांच्या पालकांच्या देखरेखीखाली मित्र आणि कुटुंबाशी जोडलेले असताना सुरक्षित राहण्यास मदत होईल यासाठी मेसेंजर किड्सचा शुभारंभ केला. या वर्षाच्या सुरुवातीस, मेटाने मेसेंजर किड्सवर प्लेज प्लॅनेट्स सुरु केले, हा एक परस्परसंवादी इन-अॅप क्रियाकलाप आहे, ज्यामुळे मुलांना उचित निर्णय ऑनलाइन कसे घ्यावे, सुरक्षित कसे रहावे आणि लवचिकता कशी निर्माण करावी हे शिकण्यास आणि त्याचे सराव करण्यास मदत होते. मेसेंजर किड्स प्लेज आणि प्लेज प्लॅनेट्स उपक्रम हे मेटाच्या युवा सल्लागारांच्या भक्कम भागीदारीत सुरू करण्यात आले. ऑनलाइन सुरक्षा, बाल विकास आणि मुलांचे माध्यम, या क्षेत्रातील तज्ञांचा हा गट मेटाला त्यांचे कौशल्य, संशोधन आणि मार्गदर्शन सामायिक करून तरुणांसाठी नवीन उत्पादने, वैशिष्ट्ये आणि धोरणे विकसित करण्यात मदत करतो.

गेल्या अनेक वर्षांत, मेटाने सुरक्षित आणि अधिक समावेशक इंटरनेट तयार करण्यासाठी आधीच अनेक प्रयत्न आणि उपक्रम सुरू केले आहेत. यामध्ये नवीन बाल सुरक्षा हबचा समावेश आहे, ज्यात तरुणांना सुरक्षित राहण्यास सहाय्यभूत होण्यासाठी मागणीनुसार व्हिडिओद्वारे सुरक्षा प्रशिक्षण, साधने आणि संसाधने यांचा समावेश आहे. १८ वर्षांवरील वापरकर्त्यांसाठी एनसीआयआयविषयी असलेल्या समस्येचा सामना करण्यासाठी, मेटाने युके रिव्हेंज पॉर्न हेल्पलाइनच्या भागीदारीत StopNCII.org सुरु केले आहे. भारतामध्ये, या व्यासपीठाने सोशल मीडिया मॅटर्स, सेंटर फॉर सोशल रिसर्च आणि रेड डॉट फाऊंडेशन यांसारख्या संस्थांसोबत भागीदारी केली आहे आणि जगभरातील महिलांना विना-सहमती अतिजवळीक प्रतिमासृष्टीचा (एनसीआयआय) प्रसार रोखण्यास आणि त्यास तोंड देण्यास सक्षम करेल. अधिक आनंददायक ऑनलाइन अनुभव प्रदान करण्याकरिता, मागील वर्षात, मेटाने फेसबुक आणि इंस्टाग्राम अॅपमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये देखील सुरू केली आहेत जसे की, हिडन वर्ड्स, लिमिट्स, कॉमेंट्स कंट्रोल, मल्टी-ब्लॉक आणि लाईक्स लपवण्यासाठी पर्याय.

महाराष्ट्र सायबर विषयी 

महाराष्ट्र सायबर ही महाराष्ट्रासाठी सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षा यासाठी असलेली राज्य नोडल एजन्सी आहे, जी सायबर गुन्ह्यांविरुद्ध जागरूकता मोहिमा राबवण्यामध्ये सतत व्यस्त असते. ही एजन्सी सायबर गुन्हे अन्वेषण प्रयोगशाळा तयार करणे, सायबर पोलीस स्टेशन्स विकसित करणे आणि महाराष्ट्रातील पोलीस बंधू आणि नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांबद्दल आवश्यक ती सर्व जागरुकता निर्माण करण्यात गुंतलेली आहे.


हे सुद्धा वाचा : 

Investing in Canadian Talent to Help Build for the Metaverse

 

शिवसेना नेत्याच्या नावाने तरूणीने केली आत्महत्येची फेसबुक पोस्ट, चित्रा वाघ आक्रमक !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी