31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeटॉप न्यूजमुंबईत २० वर्षीय तरुणीची बलात्कार करून हत्या!

मुंबईत २० वर्षीय तरुणीची बलात्कार करून हत्या!

टीम लय भारी

मुंबई : मुंबईतील शक्तीमिल कंपाउंड बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा न देता ती जन्मठेपेची करण्यात आली असतानाच मुंबई पुन्हा एकदा अशाच एका घटनेने हादरली आहे. मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये असलेल्या एचडीआयले कंपाउंडमधील एका बंद इमारतीच्या टेरेसवर एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे. या तरुणीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे(Girl aged 20 raped and murdered in Mumbai). 

कुर्ला परिसरातील एचडीआयएल कंपाउंडमध्ये या तरुणीचा मृतदेह आढळून आला. कंपाउंडमधील एका बंद इमारतीच्या टेरेसवर हा मृतदेह सापडल्यानंतर तातडीने राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला. डॉक्टरांच्या अहवालानंतर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तरुणीची ओळख अद्याप पटलेली नसून आसपासच्या पोलीस स्थानकांमध्ये बेपत्ता असल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत का, याचीही खातरजमा पोलीस करत आहेत.

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा रद्द!

सलूनमध्ये केस कापताना आठ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे; एकाला अटक

इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये उघडकीस आला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, काही तरून एचडीआयएल कंपाउंडमधील सदर बंद असलेल्या इमारतीवर इन्स्टाग्रामसाठी व्हिडीओ शूट करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना टेरेसवर तरुणीचा मृतदेह आढळून आला त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली.

संतापजनक: ‘तो’ व्हिडीओ पतीला दाखवेल अशी धमकी देत आतेभावाचा बहिणीवर अत्याचार

LLB student rape case: Vadodara court grants bail to CA

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी