33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रऐन पावसाळ्यात पुण्यात आगडोंब, 12 घरे संपुर्ण जळून खाक

ऐन पावसाळ्यात पुण्यात आगडोंब, 12 घरे संपुर्ण जळून खाक

टीम लय भारी

पुणे : ऐन पावसाळ्यात पुण्यात आग भडकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील  रक्षकनगर परिसरात पहाटेच्या सुमारास ही आग लागली. यामध्ये 12 ते 15 घरे संपुर्ण जळून खाक झाली असून अनेक कुटुंबियांचे संसारोपयोगी साहित्य असं सगळंच या आगीत भस्मसात झाले आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच पोहोचत ही आग विझवली आहे.

रक्षकनगर परिसरातील बिराजदार झोपडपट्टीला आज पहाटे 3 च्या सुमारास भीषण आग लागली. काही कळायच्या आत आगीने रौद्ररुप धारण करीत तेथील 12 ते 15 घरे गिळंकृत केली. यामध्ये अनेकांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले, परंतु सुदैवाने यात कोणतीच जीवीतहानी झाली नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलास दिली आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही वेळातच त्यांनी ही आग नियंत्रणात आणली.

या आगीत सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नसली तरीही कित्येक जणांचे संसार यात जळून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पहाटेच्या वेळी अचानक लागलेली आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. परंतु या आगीमुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.

दरम्यान, या आगीत भक्षस्थानी पडलेल्या संसाराची संपुर्ण राखरांगोळी झाल्याने पीडित चिंतेत आहेत. प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने सरकारने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

दिपाली सय्यद यांनी ‘टोचले’ संजय राऊत यांचे कान

‘यांचा दाखवायचा आणि करायचा चेहरा वेगळा…’, पडळकरांचा नेमका रोख कोणाकडे?

अडचणीत सापडलेल्या ग्लोबल टीचर डिसले गुरुजींना शिंदे – फडणवीस सरकारचा आधार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी