30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंचा सोमवारपासून उत्तर महाराष्ट्रात शिवसंवाद

आदित्य ठाकरेंचा सोमवारपासून उत्तर महाराष्ट्रात शिवसंवाद

राज्यात शिंदे-फडणवीस (Shinde-fadanavis) सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना नेता आणि माजी पर्यटन तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली. आत्तापर्यंत या यात्रेचे सहा टप्पे पुर्ण झाले आहेत. सत्ता परिवर्तन झाल्यापासून आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले असून, तेही राज्यभर दौरे काढत आहेत. आपल्या दौऱ्यात बेकायदेशीर सरकार आणि बंडखोर आमदारांवर आदित्य तोफ डागताना दिसून येतात. (Aditya Thackeray’s Shiv Samvad in North Maharashtra from Monday)

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद निष्ठा यात्रेचा सातवा टप्पा ०६ फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून सुरू होत आहे. या टप्प्यात आदित्य ठाकरे नाशिक, जालना, संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत. नाशिक दौऱ्यावर असताना सोमवार दि.०६ फेब्रुवारी रोजी मुंढेगाव येथे दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ही संवाद यात्रा सुरू होऊन वडगाव पिंगळा, सिन्नर, पळसे असा यात्रेचा क्रम असणार आहे.

निष्ठावंत शिवसैनिकांनी शिवसंवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी कंबर कसली असून गद्दारांना धडा शिकविण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. दरम्यान अलीकडेच नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजीत तांबे यांनी विजय प्राप्त केला. पण पराभूत उमेदवार शुभांगी पाटील यांनीही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. शुभांगी पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या नाशिक जिल्हा दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सोमवारपासून होणाऱ्या शिवसंवाद यात्रेच्या सातव्या टप्प्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

दिवस पहिला – ०६ फेब्रुवारी २०२३

१. ठिकाण – मुंढेगाव (संवाद)
वेळ – दुपारी १२.४५
२. ठिकाण – वडगाव पिंगळा (संवाद)
वेळ – दुपारी २.३०
३. ठिकाण – सिन्नर (राखीव)
४. ठिकाण – पळसे (संवाद)
वेळ – सायंकाळी ४.४५
५. ठिकाण – नाशिक (मेळावा)
वेळ – सायंकाळी ५.४५

दिवस दुसरा
१.ठिकाण – चांदोरी (निफाड) (संवाद)
वेळ – सकाळी ११.१५
२. ठिकाण – विंचूर (निसर्ग लॉज) (संवाद)
वेळ – दुपारी ०१.००
३. ठिकाण – नांदगाव (संवाद)
वेळ – दुपारी ०३.००
४. ठिकाण – महालगाव (वैजापूर) (संवाद)
वेळ – सायंकाळी ५.३५

दिवस तिसरा
१. ठिकाण – सोमठाणा, बदनापूर (संवाद)
वेळ – सकाळी ११.३० वाजता
२. रामनगर, जालना (संवाद)
वेळ – दुपारी १.१५
३. घनसावंगी (संवाद)
वेळ – दुपारी ०३.००
४. गेवराई (संवाद)
वेळ – सायंकाळी ४.३५

हे सुद्धा वाचा : एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंचा ‘हात’ तोडला !

आदित्य ठाकरेंचे मुंबई महापालिका प्रशासकांना पत्र; सत्ताधाऱ्यांना निवडणुका घ्यायच्या नाहीत, मुंबईचे खच्चीकरण करण्याचा हेतू

शरद पवारांच्या चुकीमुळे मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली : अजित पवार

दिवस चौथा
१. ठिकाण – बिडकीन (पैठण) (संवाद)
वेळ – सकाळी ११.३०
२. ठिकाण – पाटोदा (संभाजीनगर प.) (संवाद)
वेळ – दुपारी १२.४०
३. ठिकाण – नंद्राबाद (रत्नपुर) (संवाद)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी