33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पुन्हा एकदा मास्क वापरणे बंधनकारक होणार :  अजित पवार

राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरणे बंधनकारक होणार :  अजित पवार

टीम लय भारी

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्या पुन्हा वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मास्क वापरणे गरजेचं असंही त्यांनी सांगितले. राज्यातली कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीतीही व्यक्त केली आहे. Ajit pawar on maharashtra covid cases

यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नाव न घेता निशाना साधला आहे. काही नेते मास्क वापरत नव्हते तर दुसऱ्यांदा कोरोना झाला. आता अडचण झाली आहे. काही जन ऑपरेशन करायला गेले तर त्याचे ऑपरेशन झाले नाही.  त्यामुळे प्रत्येकाची आरोग्य महत्वाचे असते हे लक्षात घ्या, अजित पवार (Ajit pawar) म्हणाले.

याप्रसंगी त्यांनी जीएसटीवर ही भाष्य केले आहे.  मार्च 2022पर्यंत राज्याकडे येणारे जीएसटी रक्कम 29 हजार 600 कोटी रुपये होती पैकी 14 हजार कोटी रुपये राज्याला दिले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. राज्याला केंद्राकडून 15 हजार कोटी रुपये मिळणे अजूनही बाकी आहे. ही रक्कम मिळाल्यास आम्हाला विकास कामासाठी खर्च करता येतील असे त्यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा: 

तुमच्या भागात वीज पडणार असल्याची माहिती देणार दामिनी अ‍ॅप

HARDIK PATEL Gujarat: Patidar leader Hardik Patel, who recently quit Congress, joins BJP

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी