28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रमहात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाची कार्यवाही सुरू

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाची कार्यवाही सुरू

राज्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यावर काही माहिन्यांपूर्वी न्यायालयाने सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले (Savitribai Phule And Mahatma Jyotiba Phule) यांचे राष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. याची कार्यवाही देखील पुणे महापालिकेने (Pune Muncipal Corporation) केली आहे. पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा पुणे महापालिकेने ताब्यात घेतली असून कामास सुरूवात केली आहे. स्मारकाच्या कामासाठी भाडेकरू आणि जागा मालकांनी याबाबत नोटीस बजावली होती. मात्र यांनी जागा देण्यास नकार दिला होता. जागा मालक आणि भाडेकरूंनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने स्मारक करण्यासाठी संदेश दिला. यामळे भिडेवाड्याची इमारत महापालिकेने मंगळवारी पाडली आहे.

हे ही वाचा

‘ममता चोर’ नावाचे टी-शर्ट घालत भाजप नेत्यांची निदर्शने

धनगर आरक्षणासाठी दहिवडीतील उपोषणकर्त्यांची मुंबईकडे पायपीट

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर कॉल रोकॉर्ड व्हायरल करण्याचा जरांगेंचा इशारा

 

भिडेवाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे स्मारक

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी १९४८ साली पुण्याच्या बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात आली. मात्र आता भिडेवाड्याच्या इमारतीची स्थिती जिर्ण झाल्याने सरकारने त्या जागी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे स्मारक बांधण्यासाठी प्रस्तावित केलं आहे. यावर आता ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारने आणि महापालिकेने केलेल्या कार्यावाहीबद्दल आणि पोलीस प्रशासनाचे अभिनंदन केलं आहे.

महापालिकेनं भिडे वाडा घेतला ताब्यात

न्यायालयाने भिडे वाड्यच्या जागेत सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंचे स्मारक बांधण्यासाठी प्रस्तावित केलं गेलं. मात्र काही दिवसांपासून महापालिकेने जागा मालक आणि भाडोत्रींना दिलेल्या कालावधीनंतर म्हणजेच मंगळवारी भिडे वाडा पोलिसांच्या मदतीने जेसीबीच्या माध्यमातून रात्री ११ वाजता पाडण्यात आला. यावेळी ५० बिगारी, होतोडी, पहार, कटवणी, दोरी हे साहित्य घेऊन आले होते, यावेळी सुरूवातला वाड्याला लावण्यात आलेल्या पाट्या काढण्यात आल्या. त्यानंतर वाडा पाडण्यात आला आहे. या ठिकाणी कोणतीही अनुसूच घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी