28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रप्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का; हायकोर्टाने याचिका फेटाळली

प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का; हायकोर्टाने याचिका फेटाळली

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी याचिका केली होती. ही याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळून लावली. याचिकेत समाधान कारक मुद्दे नाहीत आणि निवडणूक आयोगाची भूमिका योग्य असल्याचं सांगत कोर्टाने याचिका फेटाळून लावली.

मुंबई महानगर पालिका तसच इतर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झालेल्या नाहीत. निवडणूक आयोग निवडणुका घेत नाही. हा एक प्रकारचा राज द्रोह आहे. निवडणूक आयोगाला तात्काळ निवडणुका घेण्याचे आदेश द्यावेत. त्याच प्रमाणे निवडणूक आयुक्तांवर देशद्रोहांचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. ही याचिका ऍड. रोहन पवार यांनी दाखल केली होती.तर त्याच्या वतीने ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला.


याच बाबतची याचिका सुप्रीम कोर्टात आम्ही दाखल केली आहे.सुप्रीम कोर्टाला निवडणूक आयोगाला आदेश देण्याचा अधिकार नाही. तो अधिकार हायकोर्टाला आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणुका घ्या अस म्हटलं होतं. पण त्यांना अधिकार नसल्याने त्यांनी आम्हाला हायकोर्टात जायला सांगितलं होतं. त्यानुसार आम्ही हायकोर्टात आलो होतो. निवडणूक आयोग निवडणूक घेत नाही. राज्य सरकारच्या अधिपत्या खाली निवडणूक आयोग येत नाही. निवडणूक आयोगाच्या आयुक्ताला काढायचं असेल तर जस हायकोर्टाच्या जज ला काढायची जी पद्धत आहे तशीच पद्धत आहे. निवडणूक आयोग निवडणूक न घेऊन राज्यात एक वेगळी परिस्थिती निर्माण करत आहे.गोंधळ निर्माण करत आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईतील कोस्टल रोडचे ‘हे’ फोटो पाहून तुमचे डोळे विस्फारतील!

थरारक व्हिडिओ | शार्कच्या हल्ल्यात दोन महाकाय जहाजांचा चक्काचूर

छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11  जवान शहीद

यावेळी निवडणूक आयोगाला संविधानाच 124 कलम लागू आहे की नाही हे आम्हाला पहायचं होत. मात्र, आमची बाजू कोर्टाने मान्य केली नाही. निवडणूक आयोगाची बाजू मान्य केली.आणि आमची याचिका फेटळली. तो हायकोर्टाला अधिकार आहे. आम्ही या विरोधात सुप्रीम कोर्टात आधीच आहोत. आता तिथे दाद मागू, अस याचिका कर्ते प्रकाश आंबेडकर यांनी संगीतलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी