35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रलवकरच किराणा दुकानात वाईन मिळणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

लवकरच किराणा दुकानात वाईन मिळणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

टीम लय भारी

मुंबई : राज्यात आता किराणा दुकानात, जनरल स्टोअर वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. राज्यातील वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्यासाठी राज्य सरकार आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे(Cabinet holding meeting, Wine will be available in grocery stores).

राज्य सरकार महसूलात वाढ करण्यासाठी नवा वाईन विक्रीचा प्रस्ताव आणणार आहे. महाराष्ट्रात काही काळात किराणामालाच्या दुकानात वाईन मिळणर आहे. यासंदर्भात मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. या प्रस्तावामुळे राज्याच्या महसुलात हजारो कोटी रुपयांची भर पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यातील सुपर मार्केट, वॉक इन स्टोअर आणि जनरल स्टोअरमध्ये वाईनची विक्री करणं शक्य होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही किराणा दुकानात गहू, तांदुळ किंवा इतर वस्तू घेण्यास गेलात आणि तिथे तुम्हाला वाईन दिसल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. या निर्णयाबाबत राज्य सरकार लवकरच अध्यादेश काढण्याच्या तयारीत आहे.

हे सुद्धा वाचा

टोकियो ऑलिम्पिकच्या पदक विजेत्यांनी एकत्र येत गायलं राष्ट्रगीत

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, दिल्लीतील सरकारी कार्यालयांमध्ये यापुढे आंबेडकर, भगतसिंग यांचे फोटो लागणार

एअर इंडिया 27 जानेवारीला टाटा समूहाकडे सुपूर्द करणार

Good News! Wine to be soon available in super markets and walk-in stores in Maharashtra, cabinet to approve proposal today

सध्या राज्यात दरवर्षी वाईनच्या 70 लाख बॉटल्स ची विक्री होते. सरकारच्या नव्या धोरणामुळं हा आकडा 1 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. दरम्यान, भाजपाकडून राज्य सरकारच्या या नव्या वाईन विक्री धोरणाला याआधीपासूनच विरोध दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारनं वाईन विक्रीबाबत नवा प्रस्ताव मान्य केल्यास भाजपाकडून मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. सरकारने काल वाईनवर प्रति लिटर 10 रुपयांचा अबकारी कर जाहीर केलाय त्यामुळे वाईन थोडी महाग होणार आहे.

दुसरीकडे, अनेक बेकरी पदार्थांमध्ये वाईनचा उपयोग होत असतो. बहुतेक वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे वाईनचा वापर चवीसाठी केला जात असतो. त्यामुळे दैनंदिन किराणा दुकानात होणाऱ्या वाईनची विक्री ही बीअरच्या धर्तीवर कॅनमधून विक्रीला येऊ शकते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी