28 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeराजकीय'खडसेंच्या डोक्यात बिघाड झालाय का'?

‘खडसेंच्या डोक्यात बिघाड झालाय का’?

आगामी निवडणुकांचा वेध घेता आता सत्तधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षांवर टीका करत तुटून पडत आहेत. विधानभवनात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांचा एक फोटो दाखवत महाजन यांचे दाऊदशी संबंध असल्याची टीका केली आहे. यावर गिरीश महाजन यांनी दाऊदशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितलं आहे. खडसे यांची मानसिक स्थिती बिघडली असल्याचं महाजन म्हणाले आहेत. मी ज्या लग्नाला गेले होतो त्यांचा दूरदूरपर्यंत दाऊदशी संबंध नसल्याचे गिरीश महाजन म्हणाले आहेत. ते काहीही आरोप करत सुटले असल्याचं महाजन म्हणाले आहेत.

खडसे यांनी जो फोटो दाखवला होता तो २०१५-१६ चा फोटो आहे. खूप जूना फोटो आहे. तेव्हा नाशिक शहरामध्ये मी एका लग्नाला गेलो होतो. त्यावळी सर्व राजकीय नेते, व्यवसायिक, समाजकारणी, उद्योजक सर्वच क्षेत्रातील लोकं आली होती. त्यामुळे मी ही गेलो होतो. त्यांनी कुंभमेळाव्याला खूप मोठी मदत केली होती म्हणून जायचं होतं, त्यावेळी सर्व पक्षाचे नेते पार्टीमध्ये होते, असे महाजन म्हणाले आहेत.

पार्टीतील एक फोटो दाखवण्यात येत आहे. त्याठिकाणी मुलीकडून आलेल्या पाहुण्यांचा दाऊदशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. पण याप्रकरणी चौकशी देखील करण्यात आली मात्र त्यावेळी दाऊदशी कोणतेही नातेसंबंध नसल्याचं स्पष्ट झालं, जुने फोटो काढत दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे असे महाजन म्हणाले आहेत.

हे ही वाचा

‘चमचे का वाजताहेत’; धारावी मोर्च्यावरून उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर पलटवार

दाऊद इब्राहिमला झाली विषबाधा? पाकिस्तानातील इंटरनेटसेवा बंद; काहीतरी गौडबंगाल?

मुंबई इंडियन्स संघासोबत सचिन तेंडुलकरचं नातं संपुष्टात?

खडसेंच्या डोक्यात बिघाड झाला

ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर हे सलीम कुत्ता प्रकरणी अडचणीत आले आहेत. त्यामुळे हे प्रकरण लपवण्यासाठी माझा फोटो पुन्हा एकदा बाहेर काढण्यात आला आहे. खडसेंच्या डोक्यात काय बिघाड झाला आहे. त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं महाजन म्हणाले आहेत.

पायात घालायला चप्पल नाही

सकाळ माध्यमाच्या वृत्तानुसार खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या दाखवलेल्या फोटोवरून गिरीश महाजन हे दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते असा आरोप केला होता. यावर गिरीश महाजन म्हणाले, दाऊतचा आणि त्यांचा कोणताच संबंध नव्हता. त्यांच्यावर कारवाई झालीय. त्यांच्या पायात चप्पल घालायला पैसे नाहीत. माझा सत्यानाश झाला आहे. हा कसा वर जातोय. म्हणून ते बावचळले आहेत, अशी टीका गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी