33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्ररेणू शर्माने धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल केले, अन् पुन्हा अडचणीत आली

रेणू शर्माने धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल केले, अन् पुन्हा अडचणीत आली

टीम लय भारी

मुंबई : वर्षभरापूर्वी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुन्हा तो मागे घेण्याचा प्रकार रेणू शर्मा हिने केला होता. त्यानंतर पाच कोटी रुपये रक्कम आणि पाच कोटी रुपयांचे दुकान मिळविण्यासाठी ती धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करीत होती.रेणू शर्मा हिचे हे कारस्थान पोलिसांनी चव्हाट्यावर आणले असून तिला अटक केली आहे. विशेष म्हणजे, रेणू शर्मा हिने मनसे, भाजप अशा विविध पक्षातील नेत्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावरही खोटे गुन्हे दाखल केल्याचा प्रकार गेल्या वर्षी चव्हाट्यावर आला होता.(Dhananjay Munde was blackmailed by Renu Sharma)

अन्य नेत्यांवर जसे गुन्हे दाखल केले, तसाच खोटा गुन्हा धनंजय मुंडे यांच्यावरही रेणू शर्मा हिने दाखल केला होता. पण आपले पितळ उघडे पडत असल्याचे लक्षात येताच तिने हा गुन्हा मागे घेतला होता.त्यानंतर आता परत तिने मुंडे यांना ब्लॅकमेल करायला सुरूवात केली होती. मजाकमध्ये एक कागद पोलिसात दिला तर तुमचे मंत्री पद धोक्यात आले होते.

आता पुन्हा तीच माझ्यावर बलात्कार झाला असल्याची तक्रार करून सोशल मीडियावरून बदनामी करून तुमचे मंत्रीपद घालवेन, असे होऊ द्यायचे नसेल तर मला 5 कोटी कॅश आणि 5 कोटींचे दुकान घेऊन द्या;’ असे ब्लॅकमेलिंग करत अशा प्रकारची खंडणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कथित रेणू शर्मा नामक महिलेने केली असून, धनंजय मुंडे यांनी मुंबई क्राईम ब्रँच मध्ये धाव घेत सदर महिलेविरुद्ध खंडणी मागीतल्याची तसेच ब्लॅकमेलिंग करत असल्याची पुराव्यांसह तक्रार दिली आहे.

तथाकथित रेणू शर्मा या महिलेने मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप करत खळबळ माजवली होती, त्यानंतर काही दिवसातच तिने सदर तक्रार माघारी घेतली होती. तेव्हापासून रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हाट्सएप तसेच फोन करून पैश्यांची मागणी करत होती, यासंदर्भातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसात दिले असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

‘पिछले साल एक कागज सोशल मीडिया पर डाला तो तुम्हारा मंत्री पद जानेकीं नौबत आ गई थी। अब अगर मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी। अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है?’ अशा आशयाचे मेसेज सदर महिला पाठवत असून, याद्वारे 5 कोटी रुपये कॅश व 5 कोटी रुपयांचे दुकान विकत घेऊन देण्याची मागणी रेणू शर्माने केली असल्याचे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

सदर रेणू शर्मा ही महिला मूळ इंदौर मध्य प्रदेशातील असून ती करुणा शर्माची बहीण आहे, मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रँच व इंदौर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून आधी 20 एप्रिलला इंदौर कोर्टात हजर केले होते, इंदोर कोर्टाने तिला रिमांड दिला आणि त्यानंतर आज २१ एप्रिलला रोजी सदर महिलेला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.सदर रेणु शर्मावर इतर अनेक व्यक्तींनीही ब्लॅकमेलिंग संदर्भातल्या तक्रारी यापुर्वी अनेकदा विविध पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत.


हे सुद्धा वाचा :

Woman arrested for ‘trying to extort’ money from Maharashtra minister Dhananjay Munde

राज ठाकरे म्हणजे भाजपचे अर्धवटराव:  धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृतीत सुधारणा

VIDEO : महात्मा गांधींचे महात्म्य : ब्रिटनच्या पंंतप्रधानांची साबरमती आश्रमाला

संगमनेरमधील कॅप्टन भारत भूषण मोरे यांची लेफ्टनंट कर्नल पदी निवड

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी