33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रकोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नका :  दिलीप वळसे पाटील

कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नका :  दिलीप वळसे पाटील

टीम लय भारी

मुंबई:  राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. या प्रसंगी त्यांनी देशात सुरु असलेल्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. सध्या राज्यात लाऊडस्पीकरच्या संदर्भात जो प्रश्न निर्माण झाला आहे, त्यासंदर्भात पोलिस महासंचालकांना एक आढावा बैठक घेण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. राज्यात कायदा व सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी आमच्यावर असंही त्यांनी सांगितले आहे.

राज्यामध्ये काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे चित्र आहे. सदर गोष्ट राज्य सरकार अतिशय गांभीर्याने घेत आहे. गृहमंत्र्यांनी जनतेला आहावन केले आहे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नका, संघर्ष करु नका. कोणाकडूनही अशा प्रकारचे कृत्य झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी (Dilip Walse Patil) स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरच्या वापरासंदर्भात २००५ साली निकाल दिला होता. राज्य सरकारनेही अनुक्रमे २०१५ व २०१७ साली शासननिर्णय जाहीर करुन लाऊडस्पीकर वापराची नियमावली ठरवून दिली आहे.

गृहमंत्री (Dilip Walse Patil) स्वत: राज्यातील सर्व प्रमुख विरोधी पक्षनेते व प्रमुख संघटना यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत चर्चा करणार आहे आणि नंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ज्यांना लाऊडस्पीकर लावायचे आहेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या व शासन निर्णयाच्या नियमावलीचे पालन केले पाहिजे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले.

हे सुद्ध वाचा: 

मशिदींवर सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय ऐच्छिक असेल : दिलीप वळसे-पाटील

Before Loudspeaker Decision, Key Maharashtra Leaders To Meet: Minister

महात्मा गांधींचे महात्म्य : ब्रिटनच्या पंंतप्रधानांची साबरमती आश्रमाला भेट

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी