31 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमुंबई'आमच्यावर बलात्कार होतोय', ८ महिला पोलिसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

‘आमच्यावर बलात्कार होतोय’, ८ महिला पोलिसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यामध्ये अनेक दिवसांपासून धक्कादायक घटना समोर येत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच आतापर्यंत आपण महिला तसेच मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना ऐकल्या असाव्यात. तरीही त्या बलात्काऱ्यांवर कोणत्याही प्रकारे तक्रार होत नाही. ते बाहेर सुटून येतात. अशातच आता राज्यातील ८ महिला मुंबई पोलिस दलात सक्रिय असणाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे आता कायदा आणि सुव्यस्थेचे रक्षकच सुरक्षित नसून सामान्य जनता आणि महिलांचं काय? असा प्रश्न उपस्थित होतो. यामध्ये तीन अधिकाऱ्यांसह एक पोलिस उपायुक्तांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आता या महिला पोलिस आयुक्तांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं आहे.

महिला पोलिसांचे गंभीर आरोप

आठ मुंबई महिला पोलिस दलात सक्रिय असणाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांनी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र देखील लिहिलं आहे. या महिला पोलिस दालातील सक्रिय असणाऱ्या महिलांच्या पत्राची दखल देखील घेण्यात आली आहे. या घटनेची सखोल चौकशी होणार आहे. एक पोलिस उपायुक्त, दोन पोलिस निरिक्षक आणि आणखी एका अधिकाऱ्यावर या महिला पोलिसांनी आरोप केले आहेत. तुम्हाला कमाचा बोजा देत नाही, तुम्हाला कमी लावतो, असं अमिष दाखवून महिलांचं शोषण केलं जात असल्याची गंभीर बाब आता समोर आली आहे. पोलिसांच्या सरकारी निवासस्थानी नेऊन महिला पोलिसांवर अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा

‘बच्चा है पर मन का सच्चा है’, अजित पवारांच्या टीकेला रोहित पवारांचं गाण्यातून मिश्किल प्रत्युत्तर

‘गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा’

डेव्हिड वॉर्नरचा कसोटी क्रिकेटला राम राम

आठ महिला पोलिसांनी पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले जात आहेत. आपल्यावर बलात्कार झाल्याचं या महिला पोलिसांनी म्हटलं आहे. या गंभीर घटनेबाबत महिला पोलिसांनी म्हटलं आहे. महिला पोलिसांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. निर्भया पथकांसारखी पथकं रात्री संरक्षणासाठी गस्त घालतात. मात्र पोलिस दलातील महिला सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित होतो. त्याचं कारण म्हणजे मुंबई पोलिस दलातील महिला पोलिसांनी पोलिस अधिकाऱ्यांवर बलात्कराचे गंभीर आरोप लावलेत. महिला पोलिसांनी महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी